मणिपुरात चकमक; आसाम रायफल्सचे सहा जवान शहीद
By admin | Published: May 23, 2016 04:08 AM2016-05-23T04:08:25+5:302016-05-23T04:08:25+5:30
भारत-म्यानमार सीमेलगतच्या मणिपूरमधील चंदेल जिल्ह्यात रविवारी सशस्त्र बंडखोरांसोबत उडालेल्या भीषण चकमकीत २९ आसाम रायफल्सच्या आॅफिसरसह सहा जवान शहीद झाले.
Next
इम्फाळ : भारत-म्यानमार सीमेलगतच्या मणिपूरमधील चंदेल जिल्ह्यात रविवारी सशस्त्र बंडखोरांसोबत उडालेल्या भीषण चकमकीत २९ आसाम रायफल्सच्या आॅफिसरसह सहा जवान शहीद झाले.
चंदेल जिल्ह्याच्या जौपी हेंगशी भागात दुपारी १च्या सुमारास ही चकमक घडली. या आदिवासी दुर्गम भागात दरडी कोसळल्याने वाहतूक ठप्प पडली होती. परिस्थितीची पाहणी करण्यासाठी हे जवान घटनास्थळी गेले होते. ते पाहणी करून परत येत असताना बंडखोरांनी त्यांच्यावर अंदाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात बंडखोरांच्या दोन किंवा त्यापेक्षा जास्त गटाने हा हल्ला घडवून आणल्याचा संशय आहे. गेल्या वर्षी याच जिल्ह्यात १८ लष्करी जवान शहीद झाले होते. (वृत्तसंस्था)