मणिपूरच्या राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांचा मागितला राजीनामा
By admin | Published: March 13, 2017 05:15 PM2017-03-13T17:15:51+5:302017-03-13T17:15:51+5:30
मणिपूर विधानसभा निवडणुकीनंतर राज्यातील नवीन सरकार स्थापन करण्यासाठी मुख्यमंत्री ओकराम इबोबी सिंह यांना तत्काळ आपल्या पदाचा राजीनामा देण्यास राज्यपाल नजमा हेपतुल्ला
Next
>ऑनलाइन लोकमत
इंफाळ, दि. 13 - मणिपूर विधानसभा निवडणुकीनंतर राज्यातील नवीन सरकार स्थापन करण्यासाठी मुख्यमंत्री ओकराम इबोबी सिंह यांना तत्काळ आपल्या पदाचा राजीनामा देण्यास राज्यपाल नजमा हेपतुल्ला यांनी सांगितले आहे. मात्र, मुख्यमंत्री ओकराम इबोबी सिंह यांनी पदाचा राजीनामा देण्यास नकार दिला आहे. काँग्रेसकडे बहुमताचा आकडा गाठण्याइतपत संख्याबळ असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
राजभवनातील एका वरिष्ठ अधिका-यांने दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री ओकराम इबोबी सिंह यांनी उपमुख्यमंत्री गाईखामगम आणि येथील कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष टी एन हाओकिप यांच्यासह राज्यपाल नजमा हेपतुल्ला यांची रविवारी(दि.12) रात्री भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांना लवकर राजीनामा देण्यास सांगितले. त्यामुळे राज्यात नवीन सरकार स्थापन करण्यास सुरुवात होईल. याचबरोबर नियमानुसार जोपर्यंत सध्याचे मुख्यमंत्री आपल्या पदाचा राजीनामा देत नाहीत, तोपर्यंत नवीन सरकार स्थापन करण्यात येत नाही.
यावेळी ओकाराम इबोबी सिंह यांनी राज्यपाल नजमा हेपतुल्ला यांच्याकडे राज्यात सरकार स्थापन करण्याचा दावा केला असून पार्टीच्या 28 आमदारांची यादी दाखविली. तसेच, नॅशनल पीपल्स पार्टीचे (एनपीपी) चार आमदारांचे समर्थन असल्याचेही सांगितले. यावर राज्यपाल नजमा हेपतुल्ला यांनी एनपीपीच्या चार आमदारांची नावे साध्या कागदावर असल्यामुळे एनपीपीचे अध्यक्ष आणि निवडुण आलेल्या सदस्यांना घेऊन येण्यास सांगितले, असल्याचेही माहिती या अधिका-यांने दिली.
दरम्यान, भारतीय जनता पार्टीनेही आपल्या 21 आमदारांसह अन्य पार्टीच्या आमदारांसोबत राज्यपाल नजमा हेपतुल्ला यांची भेट घेतली असून त्यांनीही सरकार स्थापन करण्यास 32 आमदारांचा पाठिंबा असल्याचे म्हटले आहे.