मनीष शिसोदियासह आपचे ५२ आमदार पोलिसांच्या ताब्यात
By admin | Published: June 26, 2016 07:53 AM2016-06-26T07:53:00+5:302016-06-26T12:01:57+5:30
पंतप्रधानांच्या निवासस्थानी मोर्चा घेऊन जाणारे दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष शिसोदियासह आपच्या ५२ आमदारांना दिल्ली पोलिसांनी तुघलक रोडवर ताब्यात घेतले आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २६ : 'आप' आमदारावरील पोलीस कारवाईमुळं आप-भाजप संघर्ष आता शिगेला पोहचला आहे. पंतप्रधानांच्या निवासस्थानी मोर्चा घेऊन जाणारे दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष शिसोदियासह आपच्या ५२ आमदारांना दिल्ली पोलिसांनी तुघलक रोडवर ताब्यात घेतले आहे. दरम्यान 'आप'च्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ७ रेसकोर्स परिसरात जमावबंदी (कलम १४४) लागू करण्यात आली आहे.
मनीष सिसोदीया यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याने, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सिसोदिया व आमचे आमदार आज (रविवार) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्यासमोर शरणागती पत्करणार असल्याचे म्हटले होते. त्यानुसार आज सकाळी सिसोदीया आपच्या आमदारांसह पंतप्रधानांच्या निवासस्थानाकडे जात असताना तुघलक रोड येथे जमावबंदीचा आदेश मोडल्याप्रकरणी यांना ताब्यात घेतले.
काल आम आदमी पार्टीचे आमदार दिनेश मोहनिया यांना दिल्ली पोलिसांनी छेडखानी आणि लैंगिक अत्याचाराच्या आरोपात अत्यंत नाट्यमयरीत्या ते पत्रकार परिषदेत बोलत असतानाच अटक केली. त्याचप्रमाणे काल दिल्लीच्या गाझीपूर मार्केट असोसिएशनच्या अध्यक्षांनी काल दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष शिसोदिया यांच्या विरोधात व्यापाऱ्यांना धमकावल्याचा आरोप केला आसून त्यांच्या विरुद्ध तक्रार दाखल केली आहे.
‘मोदी यांनी दिल्लीत आणीबाणी जाहीर केली आहे. दिल्लीच्या जनतेने ज्यांना निवडले त्यांना अटक केली जात आहे. त्यांच्यावर धाडी घालणे, दहशत निर्माण करणे आणि खोटे गुन्हे नोंदविण्याचे सत्र सुरू आहे,’ असा आरोप दिल्लीचे मुख्यमंत्री अरंविद केजरीवाल यांनी पंतप्रधानावर केला आहे.
अटक केलेले मोहनिया हे आपचे आठवे आमदार आहेत. आ. दिनेश मोहनिया यांना अटकेनंतर दंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. तिथे त्यांच्या वकिलांनी आ. मोहनिया यांना जामीन मिळावा, अशी विनंती केली. मात्र त्यांना सोमवारपर्यंत कोठडीत ठेवण्याचे आदेश दंडाधिकारी न्यायालयाने दिले आहेत.
Complaint filed against Manish Sisodia yesterday. Manish will go to 7, RCR today to surrender himself before PM pic.twitter.com/M6hbzksWDO
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) June 26, 2016