Manish Sisodia:'अरविंद केजरीवाल देशाचे पंतप्रधान असते तर...'मनीष सिसोदियांचा भाजपवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2022 02:24 PM2022-08-26T14:24:24+5:302022-08-26T14:45:54+5:30

Manish Sisodia: 'सीबीआयचे कार्यालय भाजपचे मुख्यालय झाले आहे. सीबीआयच्या पथकाने माझ्या घराचा प्रत्येक कोपरा शोधला, पण त्यांन काहीही सापडले नाही.'

Manish Sisodia: 'If Arvind Kejriwal was the Prime Minister of the country...' Manish Sisodia's attack on BJP | Manish Sisodia:'अरविंद केजरीवाल देशाचे पंतप्रधान असते तर...'मनीष सिसोदियांचा भाजपवर हल्लाबोल

Manish Sisodia:'अरविंद केजरीवाल देशाचे पंतप्रधान असते तर...'मनीष सिसोदियांचा भाजपवर हल्लाबोल

googlenewsNext

नवी दिल्ली: दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया (MANISH SISODIA) यांच्याविरोधात सुरू असलेल्यी कारवाईवरुन भाजप आणि आप आमने सामने आले आहेत. दरम्यान, आज दिल्ली विधानसभेच्या विशेष सत्रादरम्यान, मनीष सिसोदिया यांनी सभागृहाला संबोधित करताना भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. ते म्हणाले की, 'पूर्वी दिल्लीत पत्राच्या शाळा असायच्या, आम्ही सत्तेत आल्यानंतर 700 नवीन शाळा बांधल्या. 19 हजार नवीन शिक्षकांची भरती केली, मात्र याला प्रत्युत्तर म्हणून भाजपकडून बनावट एफआयआर नोंदवण्यात येत आहे,' असा आरोप त्यांनी केला. 

ते पुढे म्हणाले की, 'आज जर अरविंद केजरीवाल देशाचे पंतप्रधान असते आणि मी दुसऱ्या एखाद्या पक्षाचा शिक्षणमंत्री असतो, तर अरविंद केजरीवालांनी असेल केले नसते, उलट त्यांनी माझे काम पाहून मिठी मारली असती. एखादा पक्ष चांगले काम करत असेल, तर त्याला रोखायचे, त्याचे सरकार पाडायचे, ही विचारसरणी किती अतिशय खालच्या पातळीची आहे.'

'सीबीआय मुख्यालय हे भाजपचे मुख्यालय झाले आहे. सीबीआयच्या पथकाने घराचा प्रत्येक कोपरा शोधला, पण काहीही सापडले नाही. 14 तास छापे टाकूनही चुकीचा एक पैसाही सापडला नाही. सीबीआय आणि ईडीच्या छाप्यामुळे आम्ही घाबरलो नाहीत, म्हणून यांनी आम्हाला भाजपमध्ये येण्याची ऑफर दिली. पण, आम्ही या लोकांसमोर झुकणार नाहीत,' असंही सिसोदिया म्हणाले.

ते पुढे म्हणतात की, 'माझ्याविरुद्धचा एफआयआर वाचला आहे, हा एफआयआर पूर्णपणे खोटा आहे. तपास यंत्रणेने सूत्रांच्या आधारे संपूर्ण एफआयआर लिहिला आहे. सूत्रांचा हवाला देऊन एफआयआर लिहिला जाणे, हे मी पहिल्यांदाच पाहत आहे. मी अतिशय प्रामाणिकपणे काम केले, एका पैशाचीही फसवणूक केली नाही. माझ्यावर एक हजार छापे टाका, माझ्यातून काहीही निघणार नाही,' असा दावाही त्यांनी यावेळी केला. 

Web Title: Manish Sisodia: 'If Arvind Kejriwal was the Prime Minister of the country...' Manish Sisodia's attack on BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.