दिग्विजय सिंहांपाठोपाठ मनीष तिवारी यांनी केले पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात आक्षेपार्ह ट्विट
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2017 04:33 PM2017-09-17T16:33:09+5:302017-09-17T16:36:51+5:30
गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसच्या नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधातील टीकेची धार वाढवली आहे. मात्र मोदींवर टीका करताना काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांचा तोल ढळत आहे.
नवी दिल्ली, दि. 17 - गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसच्या नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधातील टीकेची धार वाढवली आहे. मात्र मोदींवर टीका करताना काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांचा तोल ढळत आहे. काही दिवसांपूर्वीच दिग्विजय सिंह यांनी मोदींविरोधात आक्षेपार्ह भाषा असलेले ट्विट करून वाद ओढवून घेतल्यानंतर रविवारी मोदींच्या वाढदिवशी काँग्रेसचे नेते मनीष तिवारी यांनी मोदींबाबत शिवराळ भाषेत ट्विट करून नव्या वादाला तोंड फोडले आहे.
मनीष तिवारी यांनी एका ट्विटला उत्तर देताना हे ट्विट केले आहे. त्यात त्यांनी अत्यंत शिवराळ भाषा वापरली आहे. ट्विटमध्ये तिवारी म्हणतात,"याला म्हणतात चु**ला भक्त बनवणे आणि भक्तांना पर्मनंट चु* बनवणे. जय हो! अगदी महात्माजीसुद्धा मोदींना देशभक्ती शिकवू शकत नाहीत!!!
Is Se Khate Hain Chutiyon Ko Bhakt Bana Na or Bhakton Ko Permanent Chutiya Bana Na -Jai Ho. Even Mahatma can not teach MODI Deshbhakti 😭😢😀🤡 https://t.co/JifB926g0M
— Manish Tewari (@ManishTewari) September 17, 2017
याआधी काँग्रेसचे महासचिव दिग्विजय सिंह यांनीही मोदींवर पातळी सोडून टीका केली होती. दिग्विजय सिंह यांनी ट्विटरवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उल्लेख करत असंस्कारी आणि अश्लिल भाषेत टिप्पणी केली होती. दिग्विजय सिंह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या समर्थकांचा भक्त असा उल्लेख केला होता. दिग्विजय सिंह यांनी जो फोटो शेअर केला आहे त्यामध्ये शिवी लिहिण्यात आली होती. दिग्विजय सिंह यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये लिहिण्यात आले होते , 'माझ्या दोन मोठ्या उपलब्धी आहेत - पहिली म्हणजे भक्तांना चु** बनवलं आणि चु**ना भक्त बनवलं'. यासोबतच दिग्विजय सिंह यांनी ट्विटमध्ये लिहिलं आहे की, 'हा मेमे माझा नाही आहे, पण शेअर करण्यापासून स्वत:ला रोखू शकलो नाही. लोकांना मुर्ख बनवण्यात मोदी सर्वोत्तम आहेत'. मात्र चौफेर टीकेनंतर दिग्विजय सिंह यांनी माफी मागितली होती.