मनीषा महाजन यांची उच्चस्तरीय चौकशी
By admin | Published: July 16, 2016 12:38 AM2016-07-16T00:38:13+5:302016-07-16T00:38:13+5:30
जळगाव : पातोंडा प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉ.मनीषा महाजन यांची विनयभंगसंबंधी राज्याच्या आरोग्य विभागातील प्रधान सचिव सुजाता सौनिक या उच्चस्तरीय चौकशी करीत आहे.
Next
ज गाव : पातोंडा प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉ.मनीषा महाजन यांची विनयभंगसंबंधी राज्याच्या आरोग्य विभागातील प्रधान सचिव सुजाता सौनिक या उच्चस्तरीय चौकशी करीत आहे. यासंदर्भात जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाला पत्र प्राप्त झाले होते, अशी माहिती जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्याधिकारी डॉ.श्याम निमगडे यांनी दिली. मागील आठवड्यात म्हणजेच ७ जुलै रोजी डॉ.मनीषा महाजन यांना या प्रकरणात चौकशीसंबंधी मुंबई येथे उपस्थित राहायचे होते. तेथे त्यांनी आपले खुलासे, म्हणणे सादर केले. डॉ.महाजन यांच्यासोबतच विनयभंगाच्या वेळेस त्यांच्यासोबत उपस्थित असलेल्या व्यक्तींचेही जबाब घेतले गेले, अशी माहिती मिळाली आहे. डॉ.मनीषा महाजन यांनी आपला विनयभंग झाल्याची तक्रार केली असून, राज्याच्या आरोग्य मंत्र्यांचे तत्कालीन सचिव सुनील माळी यांच्यावर त्यांनी आरोप केले आहेत. अशातच गुरुवारी डॉ.महाजन यांनी पांतोडा येथे प्राथमिक आरोग्य केंद्रातील निवासस्थानी आत्महत्या करण्याचा प्रयत्नही केला आहे.