मनमाड: तालुका भाजप चा पुढाकार पं दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण वर्ग संपन्न
By Admin | Published: July 6, 2016 09:18 PM2016-07-06T21:18:03+5:302016-07-07T00:59:35+5:30
मनमाड : नांदगाव तालुका व मनमाड शहर भाजप मंडलाच्या वतीने पंडीत दिनदयाळ उपाध्याय महाप्रशिक्षण अभियान अंतर्र्गत ? दिवसाचा निवासी कार्र्यकर्ता प्रशिक्षण वर्ग मनमाड येथे संपन्न झाला. भारतमाता प्रतिमेला अभिवादन करु न भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष दादाजी जाधव, महाप्रशिक्षण अभियानाचे जिल्हाप्रमुख मनोज दिवटे, ॲड.जयश्रीताई दौड, जिल्हा उपाध्यक्ष नितीन पांडे , जिल्हा चिटणीस नारायण पवार यांच्याहस्ते दिपप्रज्वलन करु न प्रशिक्षणवर्गाचा शुभारंभ करण्यात आला. नांदगाव तालुका अध्यक्ष दत्तराज छाजेड यांनी एकात्मता स्तोत्र म्हणून सर्र्व पाहुण्यांचे स्वागत केले. तर मनमाड शहराध्यक्ष जय फुलवाणी यांनी कार्र्यक्र माचे प्रास्ताविक केले. जनसंघ ते भाजप या विषयावर भाजप जिल्हा कोषाध्यक्ष आण्णा सावंत यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रशांत आहेर यांनी संघ परिवार, हिदुत्व आणि भाजप यांचा समन्वय या विषयावर सविस्तर सखोल अभ्यासपूर्ण उद्बोधन केले. एकात्म मानवतावाद व सांस्कृतिक राष्ट्रवाद या विषयावर जिल्हा संघटन सरचिटणीस बापूसाहेब पाटील यांनी आपले विचार मांडले. संभाजी मोरु स्कर यांनी केंद्र व राज्य सरकारची ? वर्षातील ठळक कामिगरी व विविध शासकीय योजनांची माहिती दिली. प्रशिक्षण वर्गाचा समारोप भाजपा नेते विजय साने यांच्या उपस्थितीत करण्यात आला भविष्यातील नगरपालिका, पंचायत समतिी , जिल्हा परिषदा निवडणुकांच्या विजयाची पायाभरणी करावी. असे आवाहन साने यांनी आपल्या मनोगतातून केले. या शिबीरास जेष्ठ नेते उमाकांत राय, निळकंठ त्रिभूवन, कांतीलाल लुणावत, एकनाथ बोडखे, माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र पवार, पंकज खताळ, सुनिल पगारे, महेंद्र गायकवाड, ॲड.राजेंद्र पांडे, गौरव ढोले, दिपक गायकवाड, नितीन परदेशी, चंद्रकलाताई पटणी, राहुल आहिरे, शेखर पांगुळ, डॉ.सागर कोल्हे संदीप नरवडे, ॲड.गुलाबराव पालवे, गणेश शिंदे , कृष्णा त्रिभूवन, बुढनबाबा शेख, आदी उपस्थित होतेे. कार्यक्र माचे सुत्रसंचालन सरचिटणीस अंकुश जोशी यांनी केले.(वार्ताहर)
फोटो कॅप्शन : मनमाड येथे भाजप च्या वतीने कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरात मार्गदर्शन करताना जिल्हा उपाध्यक्ष नितीन पांडे प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित विजय साने, दादाजी जाधव, मनोज दिवटे,जयश्री दौंड ,राजाभाऊ पवार,नारायण पवार ,दत्तराज छाजेड,जय फुलवानी,पंकज खताळ आदी.
(06मनमाड01)