2 जीसाठी मनमोहन सिंग यांनी दिली होती तंबी - प्रदीप बैजल
By admin | Published: May 26, 2015 11:16 AM2015-05-26T11:16:27+5:302015-05-26T11:18:05+5:30
2 जी घोटाळ्यामुळे गोत्यात आलेले माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना आता ट्रायच्या माजी अध्यक्षांनीही आरोपीच्या पिंज-यात उभे केले आहे
Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २६ - 2 जी घोटाळ्यामुळे अडचणीत आलेले माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना आता ट्रायच्या माजी अध्यक्षांनीही आरोपीच्या पिंज-यात उभे केले आहे. 2 जी प्रकरणात सहकार्य केले नाही तर त्याचे विपरीत परिणाम भोगण्यासाठी तयार राहा असा धमकीवजा इशाराच मनमोहन सिंग यांनी दिला होता असा गंभीर आरोप ट्रायचे माजी अध्यक्ष प्रदीप बैजल यांनी केला आहे.
2 जी प्रकरणामुळे गोत्यात आलेले ट्रायचे माजी अध्यक्ष प्रदीप बैजल यांनी 'द कंप्लीट स्टोरी ऑफ इंडियन रिफॉर्म्स, 2 जी पॉवर अँड इंटरप्रायझेस' हे पुस्तक लिहीले असून यात त्यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर टीका केली आहे. युपीए २ च्या कार्यकाळात मी वारंवार सत्ताधा-यांना सतर्क करत होतो, 2 जीच्या चौकशीचा फटका पंतप्रधानांना बसू शकतो हे मी तेव्हापासून सांगत होतो. कारण आम्ही पंतप्रधान व मंत्र्यांच्याच निर्णयांची अंमलबजावणी केली होती व हेच आता सिद्ध होत आहे असा उल्लेख बैजल यांनी पुस्तकात केला आहे. २००४ मध्ये दयानिधी मारन यांना टेलिकॉम खात्याचा कार्यभार देण्यास विरोध दर्शवला होता असा दावाही बैजल यांनी केला आहे.