मनमोहन सिंग यांना 2जी घोटाळ्याची माहिती होती - विनोद रॉय
By admin | Published: September 12, 2014 10:23 AM2014-09-12T10:23:27+5:302014-09-12T11:02:57+5:30
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना 2जी घोटाळ्याची माहिती होती मात्र त्यांनी याविषयी मौन बाळगले होते असा गौप्यस्फोट कॅगचे माजी प्रमुख विनोद रॉय यांनी केला आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १२ - माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना 2जी घोटाळ्याची माहिती होती मात्र त्यांनी याविषयी मौन बाळगले होते असा गौप्यस्फोट कॅगचे माजी प्रमुख विनोद रॉय यांनी केला आहे. तत्कालीन काँग्रेस खासदार संजय निरुपम, अश्वनी कुमार आणि संदीप दिक्षीत या त्रिकुटाने 2जीच्या ऑडिट रिपोर्टमधून मनमोहन सिंग यांचे नाव वगळण्यासाठी दबाव आणला होता असे रॉय यांनी म्हटले आहे.
यंत्रण आणि महालेखापरिक्षक विभागाचे (कॅग) माजी प्रमुख विनोद रॉय यांच्या नॉट जस्ट अकाऊंटेट या पुस्तकाचे प्रकाशन येत्या काही दिवसांत होणार आहे. यानिमित्त रॉय यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखात दिली आहे. यात त्यांनी यूपीए सरकारवर काही गंभीरस्वरुपाचे आरोप केले आहेत. 2जी घोटाळ्याप्रकरणी काँग्रेसचे नेते कमलनाथ यांना मनमोहन सिंग यांना सूचीत केले होते. मात्र सिंग यांनी कमलनाथ यांच्या सुचनेकडे दुर्लक्ष केले असे रॉय यांनी म्हटले आहे. मनमोहन सिंग यांचे नाव टूजीप्रकरणातील ऑडिट रिपोर्टमधून वगळावे यासाठी अश्वनीकुमार, संजय निरुपम व संजय दिक्षीत यांनी माझ्यावर दबाव टाकला असे रॉय यांनी सांगितले. तर विमान खरेदीप्रकरणातील घोटाळ्यातून नाव वगळण्यासाठी तत्कालीन हवाई मंत्र्यांनीही दबाव टाकल्याचे रॉय यांनी स्पष्ट केले. दरम्यान, काँग्रेसने रॉय यांचे आरोप फेटाळून लावले आहे. 'मी कधीच रॉय यांच्याशी बोललो नाही' असे स्पष्टीकरण संजय निरुपम यांनी दिले आहे.