कर्तारपूरला साहिब गुरुद्वाराला मनमोहन सिंग भेट देणार; मोदी, कोविंद यांनाही निमंत्रण

By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2019 06:19 PM2019-10-03T18:19:48+5:302019-10-03T18:31:52+5:30

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग कर्तारपूर साहिब गुरुद्वाराला भेट देणाऱ्या सर्व पक्षीय शिष्टमंडळात सहभागी होणार आहेत. पंजाबचे मुख्यमंत्री अमरींदर सिंग यांचे निमंत्रण मनमोहन सिंग यांनी स्वीकारले आहे.

Manmohan Singh to visit Kartarpur Sahib gurudwara; Invitation to PM Narendra Modi and ramnath Kovind too | कर्तारपूरला साहिब गुरुद्वाराला मनमोहन सिंग भेट देणार; मोदी, कोविंद यांनाही निमंत्रण

कर्तारपूरला साहिब गुरुद्वाराला मनमोहन सिंग भेट देणार; मोदी, कोविंद यांनाही निमंत्रण

googlenewsNext

नवी दिल्ली: माजी पंतप्रधान मनमोहन सिंग कर्तारपूर साहिब गुरुद्वाराला भेट देणाऱ्या सर्व पक्षीय शिष्टमंडळात सहभागी होणार आहेत. पंजाबचे मुख्यमंत्री अमरींदर सिंग यांचे निमंत्रण मनमोहन सिंग यांनी स्वीकारले आहे. मनमोहन सिंग यांनी पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्यासमवेत झालेल्या बैठकीतनंतर हे आमंत्रण स्वीकारले असल्याचे त्यांनी सांगितले आहे. 

अमरींदर सिंग यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देखील या कार्यक्रमात सहभागी होण्याचे निमंत्रण दिले आहे.  गुरू नानक देव यांच्या ५५० व्या जयंती निमित्त डेरा बाबा नानक येथे कर्तारपूर कॉरिडॉर आणि १२ नोव्हेंबरला सुल्तानपूर लोधी या कार्यक्रमातही सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 

पाकिस्तान भारतीय सीमेपासून कर्तारपूरमधील गुरुद्वारा दरबार साहिबपर्यंत तर भारत गुरदासपूरमधील डेरा बाबा नानकपासून सीमेपर्यंत कॉरिडॉर बांधणार आहे. गुरु नानक यांच्या ५५० व्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर येत्या नोव्हेंबरमध्ये हा कॉरिडॉर सुरू होणार आहे. या कॉरिडॉर मार्गे पाकिस्तानातील दरबार साहिब येथे दररोज ५ हजार शीख भाविकांना दर्शनासाठी सोडण्यात येणार आहे.

पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह मेहमूद कुरेशी यांनी आम्ही भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना कर्तारपूर कॅारिडॅारच्या उद्घाटनासाठी निमंत्रित करण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगितले होते. मात्र निमंत्रण देण्याच्या आधीच मनमोहन सिंग यांनी उद्घाटनासाठी न जाण्याचा निर्णय घेतला आहे. 

Web Title: Manmohan Singh to visit Kartarpur Sahib gurudwara; Invitation to PM Narendra Modi and ramnath Kovind too

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.