‘मन की बात’ म्हणजे देवदर्शन; पंतप्रधान नरेंद्र मोदी; देशातील लोक सकारात्मक माहितीसाठी भुकेले
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2024 05:45 AM2024-09-30T05:45:36+5:302024-09-30T05:45:51+5:30
आकाशवाणीवरील या मासिक रेडिओ कार्यक्रमाच्या ११४ व्या भागाला संबोधित करताना मोदींनी या भागाचा तसेच आपल्या कार्यकालाला १० वर्षे पूर्ण झाल्याचा उल्लेख केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : “श्रोते हेच ‘मन की बात’ कार्यक्रमाचे खरे सूत्रधार आहेत. या रेडिओ कार्यक्रमाने हे सिद्ध केले आहे की, देशातील लोक सकारात्मक माहितीसाठी किती भुकेले आहेत. सकारात्मक गोष्टी आणि प्रेरणादायी उदाहरणे त्यांना खूप आवडतात,” असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी सांगितले.
आकाशवाणीवरील या मासिक रेडिओ कार्यक्रमाच्या ११४ व्या भागाला संबोधित करताना मोदींनी या भागाचा तसेच आपल्या कार्यकालाला १० वर्षे पूर्ण झाल्याचा उल्लेख केला. या कार्यक्रमाच्या दीर्घ प्रवासात असे अनेक टप्पे आहेत, जे ते कधीही विसरू शकत नाहीत. आमच्या प्रवासात असे अनेक सोबती आहेत, ज्यांच्याकडून आम्हाला सतत सहकार्य मिळत आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून त्यांनी माहिती दिली.
‘मन की बात’ने ते खाेटे ठरवले
‘मन की बात’चे श्रोते हेच खरे सूत्रधार आहेत. कार्यक्रमात मसालेदार आणि नकारात्मक विषय असल्याशिवाय त्याकडे फारसे लक्ष दिले जात नाही, असा एक समज सर्वसाधारणपणे निर्माण झाला आहे; पण ‘मन की बात’ने तो खोटा ठरवला, असे ते म्हणाले.
एक पेड माँ के नाम
n“माझ्यासाठी ‘मन की बात’ची ही संपूर्ण प्रक्रिया मंदिरात जाऊन देवदर्शनासारखी आहे,” असे सांगत मोदी यांनी आभार मानले.
nपंतप्रधान मोदींनी जलसंवर्धन, पर्यावरण संरक्षण, ‘एक पेड माँ के नाम’ आणि स्वच्छता अभियानाचे महत्त्व अधोरेखित केले.
बायडेन यांनी ३०० वस्तू परत केल्या
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी जवळपास ३०० प्राचीन वस्तू भारताला परत केल्या.
जेव्हा लोक त्यांच्या वारशाचा अभिमान बाळगू लागतात, तेव्हा जग त्यांच्या भावनांचा आदर करते. दहा वर्षांत विविध देशांनी भारतातील अनेक प्राचीन वस्तू परत केल्या आहेत.
भारत बनला जगात निर्मितीचे ‘पॉवरहाउस’
nभारत आज जगातील एक उत्पादन शक्ती केंद्र बनला आहे आणि सरकार जागतिक दर्जाच्या वस्तूंच्या निर्मितीसाठी काम करत असल्याने सर्व देशांच्या नजरा आमच्याकडे आहेत.
nस्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन देण्यावरही भर देत आहोत, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
n‘मेक इन इंडिया’ कार्यक्रमाला दहा वर्षे पूर्ण होत असून, प्रत्येक क्षेत्रात निर्यात वाढत आहे आणि थेट परकीय गुंतवणुकीत (एफडीआय) झालेली वाढ हा त्याच्या यशाचा पुरावा आहे, यामुळे स्थानिक उत्पादकांना मोठी मदत झाली.
nआगामी सणासुदीच्या काळात स्वदेशी उत्पादने खरेदी करण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केले.