Mann Ki Baat: इटलीतून आणला देशाचा मौल्यवान वारसा; भारतातून चोरल्या गेलेल्या मूर्ती आता येतायत वापस - PM मोदी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2022 01:38 PM2022-02-27T13:38:17+5:302022-02-27T13:39:23+5:30

Mann Ki Baat: पंतप्रधान मोदी म्हणाले, आज आपण 'मन की बात' कार्यक्रमाची सुरुवात, भारताच्या यशाचा उल्लेख करून करणार आहोत. या महिन्याच्या सुरुवातीला, भारताला आपला एक मौल्यवान वारसा इटलीमधून परत आणण्यात यश आले आहे.

Mann ki baat PM Narendra Modi address to indians | Mann Ki Baat: इटलीतून आणला देशाचा मौल्यवान वारसा; भारतातून चोरल्या गेलेल्या मूर्ती आता येतायत वापस - PM मोदी

Mann Ki Baat: इटलीतून आणला देशाचा मौल्यवान वारसा; भारतातून चोरल्या गेलेल्या मूर्ती आता येतायत वापस - PM मोदी

Next

नवी दिल्ली - पंतप्रधाननरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी आज (27 फेब्रुवारी) मन की बात (Mann Ki Baat) कार्यक्रमातून देशवासियांना संबोधित केले. पंतप्रधान मोदी (PM Modi) म्हणाले, भारताचा मौल्यवान वारसा आम्ही इटलीतून परत आणला आहे.

पंतप्रधानांकडून भारताच्या यशाचा उल्लेख -
पंतप्रधान मोदी म्हणाले, आज आपण 'मन की बात' कार्यक्रमाची सुरुवात, भारताच्या यशाचा उल्लेख करून करणार आहोत. या महिन्याच्या सुरुवातीला, भारताला आपला एक मौल्यवान वारसा इटलीमधून परत आणण्यात यश आले आहे. हा वारसा आहे, अवलोकितेश्वर पद्मपाणी यांची हजार वर्षांहूनही अधिक पुरातन मूर्ती. ही मूर्ती काही वर्षांपूर्वी बिहारमधील गयाजी येथील देवी संस्थान कुंडलपूर मंदिरातून चोरीला गेली होती. मात्र, विविध प्रकारचे प्रयत्न केल्यानंतर, ही मूर्ती आता पुन्हा भारतात आली आहे. 

भगवान हनुमानजींची मूर्तीही भारतात परत आली - 
पंतप्रधान मोदी म्हणाले, काही वर्षांपूर्वी तामिळनाडूतील वेल्लोरमधून भगवान आंजनेय्यर, हनुमानजींची मूर्ती चोरीला गेली होती. हनुमानजींची ही मूर्तीदेखील 600-700 वर्षं पुरातन होती. या महिन्याच्या सुरुवातीला, आम्हाला ही मूर्ती ऑस्ट्रेलियामध्ये सापडली. आपल्या हजारो वर्षांच्या इतिहासात देशाच्या कानाकोपऱ्यात एकापेक्षा एक सूंदर अशा मूर्ती घडत गेल्या. यात श्रद्धा होती, सामर्थ्य होते, कौशल्यही होते आणि त्यांत विविधताही होती. एवढेच नाही, तर आपल्या प्रत्येक मूर्तीच्या इतिहासात त्या-त्या काळाचा प्रभावही दिसून येतो. 

गेल्या 7 वर्षांत भारतात आल्या 200 हून अधिक मूर्ती -
मोदी म्हणाले, 2013 पर्यंत सुमारे 13 मूर्ती भारतात आल्या होत्या. पण, गेल्या सात वर्षांत भारताने 200 हून अधिक मौल्यवान मूर्ती यशस्वीपणे परत आणल्या आहेत. अमेरिका, ब्रिटन, हॉलंड, फ्रान्स, कॅनडा, जर्मनी आणि सिंगापूर, अशा अनेक देशांनी भारताची भावना समजून घेत या मूर्ती परत आणण्यासाठी मदत केली.

Web Title: Mann ki baat PM Narendra Modi address to indians

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.