Mann Ki Baat : 'मन की बात' मधून रेडिओला 'डबल' फायदा; लोकप्रियतेसह झाली बक्कळ कमाई, तब्बल 30.80 कोटींचं उत्पन्न
By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2021 08:37 AM2021-07-20T08:37:39+5:302021-07-20T08:45:37+5:30
'Mann Ki Baat' radio programme generated over Rs 30.80 crore revenue : 'मन की बात' हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा महिन्याचा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमामुळे रेडिओची लोकप्रियता वाढली. याचा डबल फायदा झाला असून बक्कळ कमाई देखील केली आहे.
नवी दिल्ली - संवादाच्या नव्या माध्यमांमध्ये घुसमटत असलेल्या रेडिओला 'मन की बात' या कार्यक्रमाने (Mann Ki Baat) नवसंजीवनी दिली आहे. रेडिओसाठी हा प्रयोग एक वरदान ठरला आहे. 'मन की बात' हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा (PM Narendra Modi) महिन्याचा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमामुळे रेडिओची लोकप्रियता वाढली आहे. याचा डबल फायदा झाला असून बक्कळ कमाई देखील केली आहे. 2014 मध्ये 'मन की बात' हा कार्यक्रम सुरू झाला. या कार्यक्रमामुळे 30.80 कोटी रुपये उत्पन्न मिळाले आहे. 2017-18 मध्ये सर्वाधिक कमाई ही 10.64 कोटी झाली. राज्यसभेत एका प्रश्नाला दिलेल्या लेखी उत्तरात माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर (Anurag Thaku ) यांनी याबाबत माहिती दिली आहे.
मन की बात या कार्यक्रमाचे प्रसारण हे आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या विविध चॅनलवर महिन्यातील शेवटच्या रविवारी सकाळी 11 वाजता केलं जातं. प्रसार भारतीने आपल्या आकाशवाणी आणि दूरदर्शन नेटवर्क आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आतापर्यंत मन की बात कार्यक्रमाच्या 78 एपिसोडचं प्रसारण केलं आहे. तसेच हा कार्यक्रम वेगवेगळ्या भाषांमध्ये प्रसारित केला जात असल्याची माहिती देखील ठाकूर यांनी दिली आहे. भाजपाचे खासदार राकेश सिन्हा यांनी यासंबंधी प्रश्न उपस्थित केला होता. पंतप्रधान मोदींच्या 'मन की बात' कार्यक्रमाने रेडिओची लोकप्रियता वाढली आहे का? आणि नवसंजीवनी मिळाली आहे का? प्रश्न करण्यात आला होता.
Have you shared your inputs for the upcoming edition of 'Mann Ki Baat'?
— Mann Ki Baat Updates मन की बात अपडेट्स (@mannkibaat) July 19, 2021
Share them now on Toll Free Number 1800-11-7800.
Alternatively, you can also submit on MyGov open forum and NaMo app. #MannKiBaatpic.twitter.com/yiNzyXk0EU
अनुराग ठाकूर यांनी याला हो, असं उत्तर दिलं आहे. 'मन की बात' या रेडिओ कार्यक्रमाद्वारे पंतप्रधान मोदी देशातील जनतेशी संवाद साधत आहेत. हा एक अभिनव कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाद्वारे प्रत्येक नागरिकाला जोडला जातोय, सूचना मागवल्या जात आहेत आणि त्यांना शासनाचा एक भाग होण्याची संधीही दिली जात आहे असं ठाकूर म्हणाले. दूरदर्शनचे 34 चॅनेल्स आणि जवळपास 91 खासगी टीव्ही चॅनेल्सद्वारे संपूर्ण भारतात या कार्यक्रमाचे प्रसारण केले जात आहे. या कार्यक्रमाच्या प्रेक्षकांची संख्या ही 11.8 कोटी इतकी आहे. या कार्यक्रमामुळे पारंपरिक रेडिओमध्ये नागरिकांची रुची वाढली असून जागरूकताही निर्माण झाली आहे, असं ठाकूर यांनी सांगितलं.
2017-18, 2018-19, 2019-20, 2020-21मध्ये आकाशवाणीला किती उत्पन्न मिळाले? असा प्रश्न करण्यात आला. याबद्दलही माहिती ठाकूर यांनी दिली आहे. ‘2017-18 मध्ये 10,64,27,300 कोटी रुपये, 2018-19 मध्ये 7,47,00,000 कोटी रुपये, 2019-20 मध्ये 2,56,00,000 कोटी रुपये आणि 2020-21 मध्ये 1,02,00,000 कोटी रुपये उत्पन्न मिळाले. 2014 पासून ते आतापर्यंत 'मन की बात' या कार्यक्रमाद्वारे आकाशवाणीला 30.80 कोटींचे उत्पन्न मिळाले आहे. सर्वाधिक उत्पन्न हे 2017-18 मध्ये मिळाले. सर्वात कमी कमाई ही 2020-21 मध्ये झाली आहे. पंतप्रधान मोदींच्या 'मन की बात' या कार्यक्रमाचा हेतू हा कमाईचा नाही तर सराकरच्या मुद्द्यांवर नागरिकांशी संवाद साधण्याचा आहे, असं अनुराग ठाकूर यांनी आणखी एका प्रश्नाला उत्तर देताना स्पष्ट केलं. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.