104 वर्षांचे बॉडी बिल्डर मनोहर आइच यांचं निधन
By admin | Published: June 5, 2016 08:33 PM2016-06-05T20:33:16+5:302016-06-05T20:35:50+5:30
प्रसिद्ध बॉडी बिल्डर आणि देशाचे पहिले मिस्टर युनिवर्स मनोहर आइच यांचं निधन झालं आहे
Next
ऑनलाइन लोकमत
कोलकाता, दि. 5- प्रसिद्ध बॉडी बिल्डर आणि देशाचे पहिले मिस्टर युनिवर्स मनोहर आइच यांचं निधन झालं आहे. वयाच्या 104व्या वर्षी त्यांनी स्वतःच्या घरात अखेरचा श्वास घेतला. त्यांना अनेक आजारांनी पछाडलं होतं. 17 मार्च 1914साली त्यांचा बंगालमधल्या कुमिल्ला धामटी या गावात जन्म झाला.
1952साली त्यांनी मिस्टर युनिवर्सचा किताब पटकावला होता. त्यांची उंची 4 फूट 11 इंच एवढी कमी असल्यामुळे लोक त्यांना प्रेमानं पॉकेट हर्क्युलिस नावानंही हाक मारायचे. त्यांनी 1950 साली वयाच्या 36व्या वर्षी मिस्टर हर्क्युलिस टायटल हा किताब जिंकला होता. एशियन गेम्समध्ये त्यांनी तीनदा गोल्ड मेडल जिंकले होते.
1942मध्ये ते ब्रिटिश सेनेच्या रॉयल एअर फोर्समध्येही सामील झाले होते. तेव्हा त्यांनी एका ब्रिटिश अधिका-याच्या कानशिलात लगावली होती. त्यामुळे त्यांना जेलमध्ये जावे लागले होते. जेलमध्येही ते सतत व्यायाम करत होते. त्यावेळी जेलरही त्यांच्या खूश झाला होता आणि जेलरनं त्यांच्या जेवणाचा विशेष व्यवस्था केली होती. ते बॉडी बिल्डिंगचे कार्यक्रमही आयोजित करायचे. 'फिझिक अँड मॅजिक,' असं त्यांनी कार्यक्रमाचं नाव ठेवलं होतं. त्या कार्यक्रमात ते स्वतःच्या बॉडीची प्रात्यक्षिकं दाखवायचे.