हरयाणात मनोहरलाल खट्टर यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ
By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2019 03:26 PM2019-10-27T15:26:25+5:302019-10-27T15:35:17+5:30
हरयाणात मनोहरलाल खट्टर यांच्या नेतृत्वाखाली भाजपाला जननायक जनता पार्टीने (जेजेपी) जाहीर पाठिंबा दिल्यानंतर आता खट्टर यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे.
चंदीगड - हरयाणात मनोहरलाल खट्टर यांच्या नेतृत्वाखाली भाजपाला जननायक जनता पार्टीने (जेजेपी) जाहीर पाठिंबा दिल्यानंतर आता खट्टर यांनी रविवारी (27 ऑक्टोबर) मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. तसेच दुष्यंत चौटाला यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राज्यपाल सत्यदेव नारायण आर्य यांनी खट्टर यांना सरकार स्थापन करण्याचे निमंत्रण दिले होते. त्यानंतर आज राजभवनात हा शपथविधी सोहळा पार पडला आहे. शपथविधी सोहळ्याला अनेक दिग्गज नेते उपस्थित होते.
दुष्यंत चौटाला यांच्या नेतृत्वाखालील जेजेपीचे समर्थन मिळाल्यानंतर मनोहरलाल खट्टर यांनी राज्यपालांची भेट घेऊन सरकार स्थापन करण्यासाठी दावा दाखल केला. राज्यपालांनी त्यांना लगेचच सरकार स्थापन करण्याचे निमंत्रण दिले होते. त्याआधी भाजपा विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत नेतेपदी खट्टर यांची एकमताने निवड करण्यात आली. मनोहरलाल खट्टर यांनी सांगितले होते की, राज्यपालांनी आम्हाला सरकार स्थापन करण्याचे निमंत्रण दिले आहे. त्यानंतर देशभर दिवाळी साजरी होत असतानाच दुपारी शपथविधी सोहळा पार पडला आहे. खट्टर हे सलग दुसऱ्यांदा राज्याचे मुख्यमंत्री झाले आहेत.
Chandigarh: Manohar Lal Khattar takes oath as the Chief Minister of Haryana, at the Raj Bhawan. #HaryanaAssemblyPollspic.twitter.com/SBqHELyaAk
— ANI (@ANI) October 27, 2019
दुष्यंत चौटाला यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. भाजपाचे 40, जेजेपीचे 10 व अपक्ष 6 अशा एकूण 56 आमदारांचा आपणास पाठिंबा आहे. आपल्या सर्व समर्थक आमदारांसह आपण दावा दाखल केला होता, असे ते म्हणाले होते. दुष्यंत यांच्या मातोश्री नयना चौटाला या राज्याच्या उपमुख्यमंत्री होऊ शकतात, असे आधी सांगण्यात आले होते. भद्रा मतदारसंघातून त्या विजयी झाल्या आहेत. त्यांच्या नावाची चर्चा होती. मात्र त्यानंतर आता दुष्यंत चौटाला हे हरयाणाचे उपमुख्यमंत्री झाले आहेत.
Manohar Lal Khattar on Sunday took oath as Haryana Chief Minister for the second term after the recently concluded polls in the state.
— ANI Digital (@ani_digital) October 27, 2019
Read @ANI Story | https://t.co/XVtBeCAdOWpic.twitter.com/HU30O8VUVv
हरयाणातील वेगवान राजकीय घडामोडीत जेजेपीचे नेते दुष्यंत चौटाला यांनी शुक्रवारी नवी दिल्लीत भाजपाध्यक्ष अमित शहा यांची भेट घेतली होती आणि राज्यात भाजपच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन करण्याच्या मुद्यावर शिक्कामोर्तब केले होते. राज्यात मनोहरलाल खट्टर हे मुख्यमंत्री तर, दुष्यंत चौटाला हे उपमुख्यमंत्री असतील असे अमित शहा यांनी नंतर पत्रकारपरिषदेत जाहीर केले होते. राज्यात स्थिरतेसाठी आपण ही युती केली असल्याचे चौटाला यांनी सांगितले होते.