गोव्यातील विमानतळास मनोहर पर्रीकरांचे नाव, PM मोदींच्याहस्ते लोकार्पण
By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2022 11:12 AM2022-12-13T11:12:02+5:302022-12-13T11:12:37+5:30
मोपा विमानतळाला माझे प्रिय मित्र व गोवेकरांचे लाडके नेते दिवंगत मनोहर पर्रीकर यांचे नाव देताना मला अतिशय आनंद होत आहे.
गोव्यातील जनतेकडून मिळालेलं प्रेम, स्नेह मी विकासाच्या रूपात व्याजासह परत करीन, असे भावनिक उद्गार काढत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळाला 'मनोहर इंटरनॅशनल एअरपोर्ट' असे नाव देत या विमानतळाचे लोकार्पण केले. मोपा येथे रविवारी हा सोहळा पार पडला.
मोपा विमानतळाला माझे प्रिय मित्र व गोवेकरांचे लाडके नेते दिवंगत मनोहर पर्रीकर यांचे नाव देताना मला अतिशय आनंद होत आहे. या विमानतळामुळे गोव्याच्या कनेक्टिव्हिटीला चालना मिळेल आणि पर्यटनामुळे गोव्याची अधिक प्रगती होईल, असेही मोदींनी म्हटले.
गोंयांतलो मनोहर आंतरराश्ट्रीय विमानतळ अर्थवेवस्थेक नेट हाडटलो आनी पर्यटकांक बरो अणभव दितलो. मनोहर पर्रीकर हांणी गोंया खातीर केल्ल्या प्रगतीक तें अभिवादन थारतलें. pic.twitter.com/W7h8vvdtYH
— Narendra Modi (@narendramodi) December 11, 2022
८ वर्षांत ७२ विमानतळांची उभारणी
आमच्या सरकारने देशात विमानतळांचे जाळे वाढवले असून, गेल्या आठ वर्षांत ७२ नवीन विमानतळं उभारली आहेत. २०१४ पर्यंत देशात फक्त ७० विमानतळ होते, तेदेखील केवळ मोठ्या शहरांमध्ये परंतु गेल्या आठ वर्षात आम्ही ७२ विमानतळांची उभारणी केली. पूर्वीच्या सरकारांसाठी विमान प्रवास ही लक्झरी होती. आम्ही लोकांच्या दारापर्यंत विमानतळ नेले.
कनेक्ट टू पीपल्स : मोदींचा कानमंत्र
पणजी : गोवा दौचावर आलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा
निवडणूक जवळ येत असल्याने लोकांशी कनेक्टेड राहण्याचा मंत्र भाजपच्या मंत्री, आमदारांना दिला आहे. मोपा विमानतळाच्या उद्घाटनानंतर त्यांनी मुख्यमंत्री मंत्री व सत्ताधारी आमदारांची बैठक घेऊन चर्चा केली. प्रत्येकाशी संवाद साधला तसेच त्यांच्या कामाबद्दल माहितीही जाणून घेतली.
रेल्वे कनेक्टिव्हिटीवर भर
मोदी म्हणाले की, केवळ मोपासारखी विमानतळेच नव्हे तर डिजिटल, मोबाईल तसेच रेल्वे कनेक्टिव्हिटीवरही आमचे सरकार भर देत आहे. तेजस रेल्वे गाड्या पर्यटनाच्या दृष्टीने फायदेशीर ठरल्या. २०१५ साली १४ कोटी देशी नागरिकांनी पर्यटन केले. २०२१ मध्ये हा आकडा ७० कोटीवर पोहोचला. कोविड महामारीनंतर पर्यटन झपाट्याने वाढत आहे. गोव्याने शंभर टक्के लसीकरणाचे उद्दिष्ट सर्वात आधी प्राप्त केले. पर्यटन व्यवसायातून नोकऱ्याही निर्माण होतात आणि स्वयंरोजगारही मिळतो.
वडिलांचे स्वप्न पूर्ण झाले : उत्पल
पणजी मोपा अंतरराष्ट्रीय विमानतळाच्या लोकार्पणामुळे माझ्या वडिलांचे एक स्वप्न पूर्ण झाले, असे भावपूर्ण उद्गार माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांचे पुत्र उत्पल पर्रीकर यांनी काढले. माध्यमांशी बोलताना उत्पल म्हणाले की, मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रत्यक्षात साकारला आणि त्याचे लोकार्पण झाले हे आपल्यासाठी खूप आनंददायी आहे. कारण ते आपल्या वडिलांचेही स्वप्न होते. विमानतळाला कुणाचे नाव द्यावे. याविषयी आपल्याला काहीच बोलायचे नाही. त्या विषयातही आपल्याला पडायचे नाही, असे ते म्हणाले. आपल्यासाठी विमानतळ महत्त्वाचा आहे; कारण त्या साधनसुविधा आपल्याला वापरायला मिळणार आहेत, असेही ते म्हणाले. मोदी म्हणाले की, गोव्यात आणखी एक विमानतळ हवे, ही जनतेची अनेक वर्षांपासूनची मागणी होती. मोपाचे नियोजन अटलजींच्या सरकारच्या काळात झाले; परंतु त्यांचे सरकार गेल्यानंतर या विमानतळाच्या बाबतीत प्रगती झाली नाही. मात्र, आपले सरकार येताच २०१६ मध्ये आम्ही याची पायाभरणी केली होती.
ज्योतिर्रादित्य शिंदे म्हणाले
केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे म्हणाले की, देशात प्रथमच छोट्या प्रदेशात दोन विमानतळांची स्थापना करण्यात आली आहे. पर्यटकांना तसेच गोवेकरांना दाबोळी आणि मोपा असे दोन पर्याय आता निर्माण झाले आहेत. मागील सरकारच्या काळात वर्षभरात एकही जिथे दहेरी इंजिन सरकार असेल तिथे विकास निश्चित आहे. कमतरतेची आव्हाने दूर होतील.
४ हजार नोकऱ्या देणार - सावंत
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी विमानतळामुळे गोव्याच्या हवाई मोपाला दिवंगत पर्रीकर यांचे नाव दिले जावे, अशी विनंती केली. गोवा आणि पेडणे तालुक्यातील रहिवाशांना पुढील वर्षभरात आणखी तीन ते चार हजार नोकऱ्या निर्माण होणार आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. तसेच, माल वाहतुकीच्या दृष्टीनेही मोपा विमानतळ गोव्याला प्रगतीच्या दिशेने घेऊन जाईल, असेही त्यांनी सांगितले.