मनोज सिन्हा होणार जम्मू-काश्मीरचे नवे उपराज्यपाल; गिरीशचंद्र मुर्मू यांचा राजीनामा स्वीकारला

By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2020 11:01 AM2020-08-06T11:01:16+5:302020-08-06T11:02:22+5:30

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल गिरीशचंद्र मुर्मू यांचा राजीनामा स्वीकारला आहे, त्यानंतर मनोज सिन्हा यांची जम्मू-काश्मीरचे नवीन उपराज्यपाल म्हणून नियुक्ती केली आहे.

Manoj Sinha appointed as new lieutenant governor of Jammu and Kashmir | मनोज सिन्हा होणार जम्मू-काश्मीरचे नवे उपराज्यपाल; गिरीशचंद्र मुर्मू यांचा राजीनामा स्वीकारला

मनोज सिन्हा होणार जम्मू-काश्मीरचे नवे उपराज्यपाल; गिरीशचंद्र मुर्मू यांचा राजीनामा स्वीकारला

googlenewsNext
ठळक मुद्देमाजी केंद्रीय मंत्री मनोज सिन्हा हे माजी आयएएस अधिकारी आहेत. यापूर्वी त्यांनी अर्थ आणि गृह व्यवहार मंत्रालयात सचिव म्हणून काम पाहिले आहे.

नवी दिल्ली : सध्या जम्मू-काश्मीरमधून एक मोठी बातमी येत आहे. आता मनोज सिन्हा जम्मू-काश्मीरचे नवे उपराज्यपाल म्हणून कामकाज पाहणार आहेत. गिरीशचंद्र मुर्मू यांच्या राजीनाम्यानंतर मनोज सिन्हा यांची जम्मू-काश्मीरचे नवे उपराज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. वृत्तसंस्था एएनआयनुसार, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल गिरीशचंद्र मुर्मू यांचा राजीनामा स्वीकारला आहे, त्यानंतर मनोज सिन्हा यांची जम्मू-काश्मीरचे नवीन उपराज्यपाल म्हणून नियुक्ती केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गिरीशचंद्र मुर्मू यांच्या जागी केंद्र सरकारने गुरुवारी माजी केंद्रीय मंत्री मनोज सिन्हा यांना जम्मू-काश्मीरचे नवे उपराज्यपाल म्हणून नियुक्त केले. केंद्रशासित प्रदेश जम्मू-काश्मीरच्या उपराज्यपाल गिरीशचंद्र मुर्मू यांचा राजीनामा स्वीकारल्यानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मनोज सिन्हा यांना या पदावर नियुक्त केले आहे. जम्मू-काश्मीरच्या पुनर्रचनेनंतर गेल्यावर्षी ३१ ऑक्टोबरला गिरीशचंद्र मुर्मू यांनी उपराज्यपालपदाची सूत्रे स्वीकारली होती.

राष्ट्रपतींचे पत्रकार सचिव अजय कुमार सिंह यांनी प्रसिद्धीस दिलेल्या माहितीनुसार, मनोज सिन्हा यांची नेमणूक त्यांनी पदाचा कार्यभार स्वीकारल्यापासून लागू होईल. दरम्यान, माजी केंद्रीय मंत्री मनोज सिन्हा हे माजी आयएएस अधिकारी आहेत. यापूर्वी त्यांनी अर्थ आणि गृह व्यवहार मंत्रालयात सचिव म्हणून काम पाहिले आहे. त्यांनी रेल्वे राज्यमंत्री म्हणूनही काम पाहिले आहे.

ओमर अब्दुल्ला यांचे ट्विट
मनोज सिन्हा यांची उपराज्यपाल म्हणून नियुक्ती झाल्यानंतर जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी ट्विट केले आहे. काल रात्री अशी एक किंवा दोन नावे होती. ज्यांचे नाव समोर आले आहे, त्यांचे नावही त्यात नव्हते. आपण या सरकारवर नेहमीच विश्वास ठेवू शकता की, या स्रोतांसमोर ठेवलेल्या कोणत्याही अनुमानांविरूद्ध एक अनपेक्षित नाव येईल, असे ओमर अब्दुल्ला म्हणाले.
 

Web Title: Manoj Sinha appointed as new lieutenant governor of Jammu and Kashmir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.