मनोजकुमार यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर
By admin | Published: March 5, 2016 04:23 AM2016-03-05T04:23:32+5:302016-03-05T04:23:32+5:30
ज्येष्ठ अभिनेते आणि देशभक्तीपर चित्रपटांचे निर्माते-दिग्दर्शक अशी ओळख मिळवणारे मनोजकुमार यांना भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च प्रतिष्ठेचा असा यंदाचा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे.
नवी दिल्ली : हिमालय की गोद में, हरियाली और रास्ता, उपकार, नीलकमल, रोटी कपडा और मकान, पूरब और पश्चिम, दस नंबरी, क्रांती यांसारख्या दर्जेदार चित्रपटांमधील भूमिकांमुळे लोकप्रिय ठरलेले ज्येष्ठ अभिनेते आणि देशभक्तीपर चित्रपटांचे निर्माते-दिग्दर्शक अशी ओळख मिळवणारे मनोजकुमार यांना भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च प्रतिष्ठेचा असा यंदाचा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे. मनोजकुमार ‘भारतकुमार’
म्हणूनही ओळखले जातात. उपकार चित्रपटाची कथा, संवाद दिग्दर्शन तर
त्यांचे होतेच, त्यांची भूमिकाही गाजली.
स्वप्नपूर्तीचा आनंद : मनोजकुमार
मी मुंबईत अभिनेता व्हायलाच आलो होतो. ते स्वप्न मुंबईने पूर्ण केले. पण आज दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाल्याने मला खूपच आनंद झाला आहे. याक्षणी मला ‘भारत का रहनेवाला हूं’ हे गाणे आठवतेय. कित्येक वर्षे उराशी बाळगलेले स्वप्न आज पूर्ण झाले, या शब्दांत मनोजकुमार यांनी आनंद व्यक्त केला.