मनोजच्या मृत्यूने कुटंुबाची वंशावळच नष्ट कुटुंबात मृत्यूची मालिका थांबेना : मातेच्या आक्रोशाने अश्रू आवरणे झाले कठीण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2016 10:00 PM2016-06-22T22:00:09+5:302016-06-22T22:00:09+5:30
जळगाव: जिल्हा पोलीस दलात असलेल्या मनोज अशोक दारकुंडे (वय २९ रा.भुसावळ) यांच्या बुधवारी अपघाती मृत्यूने दारकुंडे कुटुंबाची वंशावळच नष्ट झाली आहे. दारकुंडे यांच्या कुटुंबावर आलेल्या आघाताची कहाणी मन थक्क करणारी आहे. दुश्मनावरही अशी वेळ येऊ नये असे प्रत्येकजण बोलताना दिसत नव्हते.
Next
ज गाव: जिल्हा पोलीस दलात असलेल्या मनोज अशोक दारकुंडे (वय २९ रा.भुसावळ) यांच्या बुधवारी अपघाती मृत्यूने दारकुंडे कुटुंबाची वंशावळच नष्ट झाली आहे. दारकुंडे यांच्या कुटुंबावर आलेल्या आघाताची कहाणी मन थक्क करणारी आहे. दुश्मनावरही अशी वेळ येऊ नये असे प्रत्येकजण बोलताना दिसत नव्हते.मनोजचा लहान भाऊ धनंजय याचा आठ वर्षापूर्वी भुसावळलाच खडका चौकात अपघातात मृत्यू झाला होता. मित्राला सोडण्यासाठी जात असताना त्याच्या दुचाकीला दिलेल्या धडकेत तो जागीच ठार झाला होता.त्या घटनेंनतर चार वर्षांनी ह्दयविकार व किडनीच्या आजाराने वडील अशोक दारकुंडे यांचा मृत्यू झाला. वडील रेल्वेत नोकरीला होते. त्यांच्या मृत्यूमुळे आई त्यांच्या जागी नोकरीला लागली होती. बहीण सीमा विवाहित आहे. चिंचोली ता.जळगाव येथे दिलेली आहे.जग पाहण्याआधीच मुलाचा मृत्यू पितृछत्र हरपल्यानंतर मनोजचा प्रिया हिच्याशी विवाह झाला. दोघांचा संसार सुखाचा चालला असतानाच त्यात मिठाचा खडा पडला. दोघांमध्ये सतत वाद होऊ लागले.अशातच त्यांच्या कुटुंबात आनंदाची बातमी आली.पत्नी प्रिया गरोदर राहिल्या. सारे दु:ख विसरून मनोज व त्याच्या आईला प्रचंड आनंद झाला. पहिलाच मुलगा होणार असल्याने नातेवाईकही कमालीचे खूष होते.मात्र हा आनंद काही काळच राहिला. प्रसूती होण्याआधीच बाळाचा पोटात मृत्यू झाला. त्या दु:खातून जेमतेम सावरल्यानंतर पुन्हा पती-पत्नीत वितुष्ट निर्माण झाले. वाद इतका टोकाला गेला की पत्नीने थेट घटस्फोटाचा निर्णय घेतला. चार दिवसापूर्वीच दोघांचा घटस्फोट झाल्याचे मनोजच्या नातेवाईकांनी सांगितले, तर काहींनी घटस्फोटाची नोटीस मिळाल्याचे सांगितले, त्यामुळे याबाबत वस्तुनिष्ठ माहिती मिळू शकली नाही. जग पाहण्याआधीच मुलाचा मृत्यू, त्यातच पत्नीने घेतलेला घटस्फोटाचा निर्णय यामुळे मनोज हा कमालीचा खचला होता. सतत तणावात राहत होता. उपअधीक्षकांकडे असलेल्या एका अर्जाच्या चौकशीचाही परिणाम मनोजच्या चेहर्यावर जाणवत होता. चौकशी आटोपून घरी जात असताना अपघातात ठार झाल्याचा निरोप नियंत्रण कक्षात आला. सहायक निरीक्षक राहुल वाघ यांनी नियंत्रण कक्ष अधिकारी अजय खर्डे यांना हा निरोप कळविला. त्यानंतर पोलीस दलातच सन्नाटा पसरला.मनोज हा अतिशय प्रेमळ व जीवाला जीव लावणारा मुलगा होता, असे त्याचे सहकारी मित्र गिरीश बोरसे व हरुन पिंजारी यांनी सांगितले. त्याच्या सहकार्यांना अश्रू आवरणे कठीण झाले होते. आई व मामांचा आक्रोश तर मन हेलावणारा ठरला.