भूसंपादन मोबदल्यासाठी मनपावर जप्ती वॉरंट मेहरूण घरकूलसाठी संपादित केली होती जमीन : लेखी हमीपत्र दिले; आता खाते सीलसाठी अर्ज
By Admin | Published: March 29, 2016 12:24 AM2016-03-29T00:24:00+5:302016-03-29T00:24:00+5:30
जळगाव : मनपाच्या घरकूल योजनेसाठी मेहरूणमधील संपादित केलेल्या जमिनीचा मोबदला न मिळाल्याने जमीन मालकाच्यावतीने सोमवारी मनपाला सुमारे ४ कोटींच्या रकमेसाठी दिवाणी न्यायालय (वरिष्ठस्तर) यांच्या आदेशाने जप्ती वॉरंट बजावण्यात आले. मनपा आयुक्तांनी स्वत: हे वॉरंट स्वीकारले. तसेच लेखा विभागाला याबाबत लेखी हमीपत्र देण्याचे निर्देश दिले.
ज गाव : मनपाच्या घरकूल योजनेसाठी मेहरूणमधील संपादित केलेल्या जमिनीचा मोबदला न मिळाल्याने जमीन मालकाच्यावतीने सोमवारी मनपाला सुमारे ४ कोटींच्या रकमेसाठी दिवाणी न्यायालय (वरिष्ठस्तर) यांच्या आदेशाने जप्ती वॉरंट बजावण्यात आले. मनपा आयुक्तांनी स्वत: हे वॉरंट स्वीकारले. तसेच लेखा विभागाला याबाबत लेखी हमीपत्र देण्याचे निर्देश दिले. मनपाने घरकूल योजनेसाठी इंदूबाई नाईक व ज्ञानदेव वामन नाईक यांची मेहरूणमधील रत्नाकर नर्सरी जवळील जमिनीचे संपादन केले होते. त्याबाबत न्यायालयाने मनपाला इंदूबाई नाईक यांना १ कोटी ५२ लाख ९० हजार ६८३ रुपये तर ज्ञानदेव नाईक यांना २ कोटी ४० लाख १३ हजार ६०७ रुपये मोबदला देण्याचे आदेश वरिष्ठस्तर दिवाणी न्यायालयाने १८ फेब्रुवारी २०१६ रोजी दिले होते. मात्र मनपाने या रक्कमेचा भरणा न केल्याने जप्ती वॉरंट काढण्यात आले होते. ते आज बजावण्यात आले. जमीन मालकांचे वकील नारायण लाठी हे सोमवारी सायंकाळी बेलीफ सह मनपात आले. त्यांनी आयुक्तांची भेट घेऊन हे जप्ती वॉरंट बजावले. आयुक्तांनी स्वत: ते स्वीकारले. तसेच लेखा विभागाला याबाबत लेखी हमीपत्र देण्याचे निर्देश दिले. त्यानुसार लेखाविभागाने हमीपत्र दिले.---- इन्फो---२० कोटी वाढीव मोबदल्यासाठी अपिलजमीन मालकाच्यावतीने मनपाकडून मंजूर झालेला मोबदला पुरेसा नसल्याने वाढीव २० कोटींच्या मोबदल्यासाठी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात अपिल दाखल करण्यात आले असल्याची माहिती ॲड.लाठी यांनी दिली. ---- इन्फो---मुख्य लेखाधिकारी यांनी दिले लेखीसद्यस्थितीत मनपाची आर्थिक स्थिती बिकट असल्याने पैसे भरू शकत नाही. शासनाकडून पैसे उपलब्ध झाल्यास हा मोबदला दिला जाईल, असे लेखी हमीपत्र मुख्यलेखाधिकारी यांनी यावेळी दिले. ---- इन्फो---बँकखाते सीलची मागणी करणाररक्कम देण्यास मनपाने असमर्थता दर्शविल्याने जमीन मालकाच्यावतीने आता या रकमेच्या वसुलीसाठी मनपाचे बँक खाते सील करण्याचा अर्ज न्यायालयात दिला जाणार आहे.