मनपा बसविणार नळाला मीटर : महापौर
By admin | Published: August 4, 2015 10:30 PM2015-08-04T22:30:30+5:302015-08-05T00:34:59+5:30
लातूर शहर महापालिका नळाला स्वत: मीटर बसविणार आहे़ त्या मीटरची वसुली पाणीपुरवठा सुरळीत झाल्यास केली जाईल, असे सांगत महापौर अख्तर शेख म्हणाले, लातूरच्या पाणीप्रश्नावर मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली आहे़ मनपा कर्मचार्यांच्या चुकीमुळे टंचाईत भर पडली आहे़ यापुढे कर्मचार्यांचा हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही़ शहरातील खाजगी विंधन विहिरी अधिगृहण केल्या जातील़ तसेच सर्व्हिसिंग सेंटर बंद करण्यात येतील, सर्व सदस्यांनी मांडलेल्या सूचनांचे पालन केले जाईल़ तसेच सर्व विषयांना मंजुरी देण्यात येत आहे़

टंचाईचा नवीन आराखडा : आयुक्त
३० जूनपर्यंतचा टंचाईचा आराखडा असतो़ तोपर्यंतचाच आराखडा आपला तयार होता़ पाणी टंचाई लक्षात घेवून पाणीपुरवठ्यात बदल केला़ धरणात पाणी आले नसल्याने आता नवीन आराखडा तयार केला आहे़ पंधरा दिवसाला एक पाणी दिल्यास दीड महिने लातूरला पाणी पुरवठा होईल़ ऑगस्ट महिन्याचे वेळापत्रक तयार आहेत़ त्यात आता बदल होणार नाही़ शहरात ५२५ विंधन विहिरी सुरू आहेत़ गरजेप्रमाणे टँकरची संख्या वाढविण्यात येईल़ मिनी वॉटर सप्लायवरील कनेक्शन तात्काळ बंद करण्यात येतील़ सदस्यांनी केलेल्या सुचनांचे पालन केले जाईल, असे आयुक्त सुधाकर तेलंग यांनी सांगितले़
महापौरांच्या डोळ्यात अश्रू़़़
सभागृहात शिवसेनेच्या सुनिता चाळक यांनी मंगळवारी महापौरांच्या दिशेने बाटली भिरकावली़ विरोधी पक्षाच्या सदस्यांनी गोंधळ घालून महापौरांच्या विरोधात घोषणा दिल्या़ यावर शेवटी महापौर अख्तर शेख म्हणाले, आज मी या खुर्चीवर आहे़ उद्या अजून दुसरा कोणी असेल़ सभागृहात शिस्त बाळगायला हवी़ भावनेच्या भरात काहीतरी करून राजकारण होत नाही़ शेवटी आपण आपली प्रतिष्ठाही जोपासली पाहिजे, असे म्हणत त्यांच्या डोळ्यातून आश्रू निघाले़ सभागृहात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला गोंधळ त्यांना बोचल्याचे सांगण्यात आले़