माणूसकी... सायकल रिक्षावाल्यास बस ड्रायव्हरचा आधार, कमी केला चढावरील भार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2022 11:59 AM2022-11-04T11:59:15+5:302022-11-04T12:02:05+5:30
सोशल मीडियामुळे गल्लीतली घटना दिल्लीत बसून दिल्लीतील घटना गल्लीत बसून आपणाला सहज पाहायला मिळते.
बुडत्याला काडीचा आधार ही म्हण आपण अनेकदा ऐकली आहे. मात्र, सायकल रिक्षाला बसचा आधार.. ही वस्तूस्थिती चक्क एका पुलावर पाहायला मिळाली. सोशल मीडियावर सध्या माणूसकी जपणारा हा भावनिक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. मधुरा ट्रॅव्हलफेक या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून अल्पावधीतच ६ लाख ९१ हजार लाईक्स मिळाले आहेत. सोशल मीडियावर या बस ड्रायव्हरचे कौतुक होत असून नेटीझन्सने कमेंटमध्ये आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
सोशल मीडियामुळे गल्लीतली घटना दिल्लीत बसून दिल्लीतील घटना गल्लीत बसून आपणाला सहज पाहायला मिळते. त्यामुळेच, अनेकदा लहान-सहान घटना, व्हिडिओ किंवा काही प्रसंग व्हायरल होत असतात. त्यात, कधी मरहाणीच्या घटना, पोलिसांच्या घटना, नेतेमंडळीचे व्हिडिओ, सेलिब्रिटींचे व्हिडिओ, कधी सर्वसामान्यांचे व्हिडिओ, कधी भावनिक व्हिडिओही समोर येतात. असाच एक भावनिक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये एका सायकल रिक्षावाल्याचं ओझं हलकं करण्याचं काम बस ड्रायव्हरने केल्याचं दिसून येत आहे.
एका मार्गावर सायकल रिक्षाचालक मॅट्रेस म्हणजे गाद्यांचं ओझं आपल्या सायकलीवर घेऊन जात होता. त्यावेळी, चढावर लागल्यानंतर बस ड्रायव्हरने आपल्या बसचा स्पीड कमी करुन सायकलचालकास आधार दिला. बसच्या स्पीडने सायकल चालकाचा भार कमी झाल्याचं दिसून येत आहे. गाडीतून एका महिलेने हा व्हिडिओ शूट केला असून सध्या तो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ नेमका कोणत्या रस्त्यावरच आहे, हे निश्चित माहिती नाही.