जन्मठेपेच्या अनेक शिक्षा एकानंतर एक

By admin | Published: July 20, 2016 05:24 AM2016-07-20T05:24:47+5:302016-07-20T05:24:47+5:30

एखाद्या दोषीला एकाहुन अधिक जन्मठेपेच्या शिक्षा झाल्या असल्यास त्या एकदम नव्हे तर एकानंतर एक भोगाव्या लागतील

Many life imprisonment is one after the other | जन्मठेपेच्या अनेक शिक्षा एकानंतर एक

जन्मठेपेच्या अनेक शिक्षा एकानंतर एक

Next


नवी दिल्ली : एखाद्या दोषीला एकाहुन अधिक जन्मठेपेच्या शिक्षा झाल्या असल्यास त्या एकदम नव्हे तर एकानंतर एक भोगाव्या लागतील, असा महत्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिले.
सरन्यायाधिश टी. एस. ठाकूर यांच्या नेतृत्वाखालील पाच सदस्यीय घटनापीठाने किचकट स्वरूपाचे अनेक कायदेशीर प्रश्न मंगळवारी निकाल काढले. या घटनापीठात न्यायमूर्ती एफएमआय कालीफुल्ला, ए. के. सिकरी, एस. ए. बोबडे ल आर. बानमुती यांचा समावेश होता. एखाद्या दोषीला एकाच किंवा जास्त खटल्यांत एकाहून अधिक जन्मठेपेच्या शिक्षा ठोठावल्या जाऊ शकतात काय तसेच एकाहून अधिक जन्मठेपेच्या शिक्षा झाल्यास त्या एकदम भोगायच्या की एकानंतर एक भोगायच्या, असा प्रश्न एका याचिकेत विचारण्यात आला होता.
>...तर हासुद्धा पर्याय
ए. मुथुरमलिंगम यांनी ही याचिका केली होती. त्यावर घटनापीठाने सांगितले की, कनिष्ठ न्यायालये आणि उच्च न्यायालये ठरावीक काळाची कैद तसेच जन्मठेप अशी एकानंतर एक भोगावयाची शिक्षा ठोठावू शकतात. यात दोषीला आधी ठरावीक काळाची कैद आणि नंतर जन्मठेप भोगण्यास सांगितले जाऊ शकते.

Web Title: Many life imprisonment is one after the other

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.