कडक निर्बंधांमुळे काश्मिरातील अनेक विवाह रद्द, संपर्कातही अडचणी

By प्रसाद गो.जोशी | Published: August 13, 2019 06:24 AM2019-08-13T06:24:31+5:302019-08-13T06:25:51+5:30

‘काश्मीर खोऱ्यातील सध्याची स्थिती लक्षात घेता माझ्या मुलाच्या निकाहनिमित्त आयोजिलेला स्वागतसमारंभ रद्द केला आहे. आमंत्रितांना होणा-या गैरसोयीबद्दल क्षमस्व' अशा आशयाच्या जाहिराती सध्या वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध होत आहेत.

Many marriages in Kashmir canceled due to strict restrictions, difficulties in communication | कडक निर्बंधांमुळे काश्मिरातील अनेक विवाह रद्द, संपर्कातही अडचणी

कडक निर्बंधांमुळे काश्मिरातील अनेक विवाह रद्द, संपर्कातही अडचणी

Next

श्रीनगर : ‘काश्मीर खोऱ्यातील सध्याची स्थिती लक्षात घेता माझ्या मुलाच्या निकाहनिमित्त आयोजिलेला स्वागतसमारंभ रद्द केला आहे. आमंत्रितांना होणा-या गैरसोयीबद्दल क्षमस्व' अशा आशयाच्या जाहिराती सध्या वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध होत आहेत.
३७० कलम रद्द झाल्यानंतर काश्मीरमध्ये शांतता कायम राहावी म्हणून संचारबंदीसह आणखी काही निर्बंध आहेत. त्यामुळे काश्मिरी नागरिकांचे विवाह, घरगुती सोहळे रद्द झाल्याचे नातेवाईक, निमंत्रितांना कळावी म्हणून वृत्तपत्रात जाहिरात दिल्या जात आहेत.
अशा अनेक जाहिरातींनी श्रीनगर येथील ‘ग्रेटर काश्मीर' वर्तमानपत्राचे पान भरून गेले आहे. इंटरनेट, लँडलाईन, मोबाइल सेवाही पूर्णपणे बंद करण्यात आली होती. या कारणामुळे विवाह सोहळे तसेच इतर समारंभ अडचणीत आले होते. काश्मीर खोºयातील जनतेचा परस्परांशी संपर्क होणेही कठीण बनले होते. बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर शनिवारपासून काश्मीरमध्ये संचारबंदी काही प्रमाणात शिथिल केली. (वृत्तसंस्था)

अन्य राज्यांतील काश्मिरींपुढेही पेच
काश्मीरमधील जे विद्यार्थी दिल्ली व अन्यत्र शिकत आहेत किंवा जे काश्मिरी नागरिक अन्य राज्यांत स्थलांतरित झाले आहेत, त्यांना नातेवाईकांशी संपर्क साधण्यात अडचणी येत आहेत. काही जणांच्या घरात होणारे विवाह रद्द झाल्याची बातमीही या लोकांपर्यंत वेळेवर पोहोचू शकली नव्हती.

Web Title: Many marriages in Kashmir canceled due to strict restrictions, difficulties in communication

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.