मुंबईसह अनेक ठिकाणी प्राप्तिकर विभागाच्या धाडी

By admin | Published: November 10, 2016 07:09 PM2016-11-10T19:09:12+5:302016-11-10T20:31:08+5:30

प्राप्तीकर विभागानंही मुंबईसह चंडिगड, लुधियाना, दिल्लीतल्या ब-याचशा ठिकाणी धाडी टाकल्या आहेत.

In many places like Mumbai, the Income Tax Department's Dhandi | मुंबईसह अनेक ठिकाणी प्राप्तिकर विभागाच्या धाडी

मुंबईसह अनेक ठिकाणी प्राप्तिकर विभागाच्या धाडी

Next

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 10 - 500 आणि 1000 रुपयांच्या नोटांवर बंदी घालण्याचं केंद्रानं महत्त्वाचं पाऊल उचलल्यानंतर आता प्राप्तिकर विभागाकडूनही मुंबईसह चंडिगड, लुधियाना, पंजाब, दिल्लीतल्या कारोल बाग, दरिबा कलन आणि चांदणी चौकमध्ये धाडी टाकण्यात आल्या आहेत. 

गेल्या काही दिवसांपासून बोकाळलेल्या भ्रष्टाचाराला नियंत्रणात आणण्यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून या धाडी टाकण्यात आल्या आहेत. अचानक टाकण्यात आलेल्या धाडींमुळे अनेकांचे धाबे दणाणले आहेत. मात्र धाडी सत्रांमधून प्राप्तिकर विभागाला नेमकं काय सापडलं आहे, हे अद्याप स्पष्ट झालं नाही.

ज्या शहरात 500 आणि 1000च्या नोटांनी जास्त सोने खरेदी झालं आहे, अशा ठिकाणी या धाडी टाकण्यात आल्या आहेत. तसेच परकीय चलनाद्वारे हवाला रॅकेटही चालवलं जात असल्याचा प्राप्तिकर विभागाला संशय आहे. काही ठिकाणी 10 ग्रॅम सोनं 50 हजारांपर्यंत विकलं जातं असून, डॉलरची किंमतही 100 रुपयांच्या वर गेल्यानं छोट्या बाजाराच्या माध्यमातूनही हवाला रॅकेट चालवलं जात असल्याची शंका प्राप्तिकर विभागाला आली आहे.  

 

 

Web Title: In many places like Mumbai, the Income Tax Department's Dhandi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.