अनेक पॉर्न साईट्स ब्लॉक?

By admin | Published: August 2, 2015 10:45 PM2015-08-02T22:45:56+5:302015-08-03T12:06:47+5:30

भारतात अनेक पॉर्न वेबसाईट्सवर गुपचूपपणे बंदी लादल्याची चर्चा असून सरकारच्यावतीने याबाबत अधिकृतपणे अद्याप कुठलाही खुलासा करण्यात आलेला नाही

Many porn sites block? | अनेक पॉर्न साईट्स ब्लॉक?

अनेक पॉर्न साईट्स ब्लॉक?

Next

नवी दिल्ली : भारतात अनेक पॉर्न वेबसाईट्सवर गुपचूपपणे बंदी लादल्याची चर्चा असून सरकारच्यावतीने याबाबत अधिकृतपणे अद्याप कुठलाही खुलासा करण्यात आलेला नाही. अनेक लोकप्रिय पॉर्नग्राफी वेबसाईटस तूर्तास ब्लॉक झाल्याचे दिसून येत आहे. सक्षम प्राधिकरणाच्या निर्देशानुसार सदर वेबसाईट्स ब्लॉक करण्यात आल्याचा संदेश त्यावर येत आहे. पॉर्नहब, ब्रेझर्स, रेडट्यूब,बँग ब्रदर्स यासारख्या लोकप्रिय पॉर्न साईट्स ब्लॉक झाल्याचे समोर आले आहे.
स्पेक्ट्रानेटच्या दिल्ली ब्रॉडब्रँड कनेक्शनवरून सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या १३ पॉर्न साईट्सपैकी ११ साईट्स उघडल्याच नाही. अर्थात मोबाईल फोनद्वारे त्या सहजपणे उघडल्या. सरन्यायाधीश एच.एल. दत्तू यांनी, घरी पॉर्न पाहणाऱ्यांवर बंदी लादणे हे घटनेच्या कलम २१ चे उल्लंघन ठरेल, म्हणजेच व्यक्तीच्या वैयक्तिक स्वातंत्र्यावर गदा आणणारे ठरेल, असे म्हटले होते. अशा प्रकारची बंदी लादली जाऊ शकत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले होते. एका याचिकेवरील सुनावणीदरम्यान न्यायालयाने हे मत दिले होते.  ८०० हून अधिक साईट्स ब्लॉक केल्याची माहिती आता समोर आली आहे.

Web Title: Many porn sites block?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.