Corona Vaccination: आता लस संकट? अनेक राज्यांत तुटवडा; लसीकरण ठप्प होण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2021 08:58 AM2021-04-09T08:58:56+5:302021-04-09T09:00:53+5:30

Corona Vaccination: एकीकडे कोरोना (Corona Virus) विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालले असताना दुसरीकडे कोरोना लसींच्या (Corona Vaccine) तुटवडा देशातील अनेक राज्यांमध्ये निर्माण झाला आहे.

many states could stop corona vaccination drive due to lackness | Corona Vaccination: आता लस संकट? अनेक राज्यांत तुटवडा; लसीकरण ठप्प होण्याची शक्यता

Corona Vaccination: आता लस संकट? अनेक राज्यांत तुटवडा; लसीकरण ठप्प होण्याची शक्यता

Next
ठळक मुद्देदेशातील अनेक राज्यांमध्ये कोरोना लसीचा तुटवडादोन ते तीन दिवस पुरेल एवढाच कोरोना लसींचा साठाकोरोना लसीकरण ठप्प होण्याची शक्यता

नवी दिल्ली: एकीकडे कोरोना (Corona Virus) विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालले असताना दुसरीकडे कोरोना लसींच्या (Corona Vaccination) तुटवडा देशातील अनेक राज्यांमध्ये निर्माण झाला आहे. केंद्राकडे सातत्याने कोरोना लसींचा पुरवठा मोठ्या प्रमाणावर करण्याची मागणी केली जात आहे. लसींच्या अभावी महाराष्ट्र, दिल्लीसह अनेक राज्यांमध्ये कोरोना लसीकरण मोहीम ठप्प होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. (many states could stop corona vaccination drive due to lackness)

महाराष्ट्रातील कोरोना लसींच्या तुटवड्यामुळे केंद्र विरुद्ध राज्य असा वाद रंगताना दिसतोय. महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांकडून केंद्राला कोरोना लसींच्या पुरवठ्याबाबत मागणी केली जात आहे. तसेच आरोप-प्रत्यारोपही होताना दिसत आहेत. महाराष्ट्रासह दिल्ली, तेलंगण, ओडिशा, आंध्र प्रदेश, छत्तीसगड या राज्यांमध्ये कोरोना लसींचा तुटवडा जाणवू लागल्याने आता लसीकरण मोहीम थांबवण्याची शक्यता निर्माण झाल्याचे सांगितले जात आहे. 

केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी महाराष्ट्राची माफी मागावी; नाना पटोले संतापले

दिल्ली, आंध्र प्रदेशमध्ये तुटवडा

दिल्लीतील कोरोना लसीकरण योग्य दिशेने सुरू आहे. मात्र, दिल्लीत केवळ चार दिवस पुरेल, एवढाच लसींचा साठा आहे. पर्याप्त लसीकरणासाठी आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी दोनवेळा केंद्राला पत्र पाठवल्याची माहिती मिळाली आहे. तर, दुसरीकडे आंध्र प्रदेशमध्ये केवळ तीन लाख लसींचे डोस उपलब्ध असून, फक्त दोन दिवस पुरेल, इतका लस साठा आहे. लसी उपलब्ध न झाल्यास लसीकरण केंद्र बंद करून मोहीम थांबवावी लागेल, असे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांनी म्हटले आहे. 

७०० कोरोना लसीकरण केंद्र बंद

कोरोना लसीच्या कमतरतेमुळे ओडिशामधील १४०० पैकी तब्बल ७०० लसीकरण केंद्र बंद करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. राज्यातील अनेक ठिकाणची कोरोना लसीकरण केंद्र बंद करण्यात आली आहेत. राज्यात केवळ दोन दिवसांपुरताच कोरोना लसींचा साठा उपलब्ध आहे. कोरोना लसींचा पुरवठा झाला नाही, तर राज्यातील कोरोना लसीकरण ठप्प होईल, अशी शक्यता आरोग्यमंत्री नब किशोर दास यांनी वर्तवली आहे. 

राज्याला एकत्रच ३-४ कोटी डोस उपलब्ध करून केंद्राने प्रश्न निकाली काढावा; रोहित पवारांचा सल्ला

देशात कोरोना लसीचा तुटवडा नाही

देशातील कोणत्याही भागात कोरोना लसीचा तुटवडा नसल्याचे केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितले. केंद्र सरकार सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना गरजेनुसार पुरवठा करत असल्याचे हर्षवर्धन यांनी यावेळी स्पष्ट केले. महाराष्ट्राला आतापर्यंत एक कोटी ०६ लाख कोरोना लसींचे डोस पुरवण्यात आले असून, ९० लाख डोस वापरले गेले आहेत, अशी माहिती डॉ. हर्षवर्धन यांनी दिली आहे. 

दरम्यान, देशात महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोना रुग्ण असतानाही लसीच्या पुरवठ्याबाबत दुजाभाव का कशासाठी? राज्यात केवळ साडेसात लाख लसीचे डोस पुरवण्यात आले. पण इतर राज्यांना ४० लाखांहून अधिक डोस देण्यात आले आहेत. यात राजकारणाचा मुद्दा नाही. पण ज्या पद्धतीने पुरवठा केला जात आहे ते योग्य नाही. दर आठवड्याला आम्हाला ४० लाख डोसेस द्या त्यापेक्षा अधिक आमची काहीच मागणी नाही, असे महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे. 
 

Web Title: many states could stop corona vaccination drive due to lackness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.