एनएडीटीवर अनेक राज्यांची नजर
By admin | Published: October 14, 2015 12:25 AM2015-10-14T00:25:13+5:302015-10-14T00:25:13+5:30
नवीन जागेसाठी प्रयत्न सुरू
Next
न ीन जागेसाठी प्रयत्न सुरूराज्य सरकारची उदासीनता कायमनागपूर : नॅशनल अकॅडमी ऑफ डायरेक्ट टॅक्सेस(एनएडीटी)च्या नागपुरातील अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अकॅडमीसाठी अतिरिक्त जमिनीची आवश्यकता आहे. यासंदर्भात राज्याचे प्रधान सचिव स्वाधीन क्षत्रीय यांना पत्रही पाठविण्यात आले आहे. मात्र त्यानंतर काहीच निष्पन्न झाले नसून याबाबत हालचाली होतांना दिसत नाही. दुसरीकडे देशातील इतर राज्यांचे लक्ष याकडे लागले असून, येथील नेत्यांनी संबधित शासनाला एनएडीटीसाठी जागा उपलब्ध करण्याबाबत एनएडीटीशी पत्रव्यवहार करण्याचे आवाहन केले आहे. छिंदवाडा रोडवर एनएडीटीची संस्था असून येथे आयआरएससाठी निवड झालेल्या अधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाते. ही नागपूरसाठी गर्वाची बाब आहे. आयकर विभागाच्या सहायक आयुक्तापासून मुख्य आयकर आयुक्तांसारख्या अधिकाऱ्यांना येथे प्रशिक्षण दिल्या जाते. यासोबतच रेल्वे, कस्टम एक्साईज तसेच संरक्षण विभागाचे लेखा अधिकारीही येथूनच प्रशिक्षण घेतात. ही संस्था १५० एकरमध्ये पसरली आहे. मात्र आता ही संस्था शहरात राहील की, नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे. कामाचा भार वाढल्यामुळे संस्थेला विस्तार योजनेसाठी अधिक जागेची आवश्यकता आहे. यासाठी संस्थेच्या समोर असलेली प्रादेशिक मनोरुग्णालयाची ३५ एकर जमिनीची निवड करण्यात आली आहे. संस्थेने सरकारकडे या जागेसाठी मागणी केली आहे. मात्र या जागेवर जिल्हा रुग्णालय स्थापन करण्याची घोषणा सरकारने आधीच केली असल्याने सरकारचीही अडचण वाढली आहे. अशावेळी जमीन मिळाली नाही तर दुसऱ्या ठिकाणी जागा शोधण्याशिवाय एनएडीटीकडे पर्याय उरणार नाही. एनएडीटीची आवश्यकता लक्षात घेत इतर राज्यांनी याचा फायदा घेण्यासाठी प्रयत्न सुरू केले असून आपल्या राज्यात जमीन देण्याची तयारीही दर्शविली असल्याचे सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार एका राज्याच्या एका मोठ्या नेत्याने तर, एनएडटीकडून पत्र मिळाल्यास तासाभरात जमीन देण्याचा दावा केला आहे.विकासासाठी जमीन आवश्यकचसंस्थेत संसाधन विकसित करुन आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त करण्यासाठी अतिरिक्त जमिनीची मागणी केली जात आहे. या जागेवर फुटबॉल, हॉकीचे मैदान तसेच मनोरंजन केंद्र निर्माण करायचे आहे. याशिवाय नवीन वसतिगृहाचे निर्माण करणे आवश्यक आहे, कारण आता हजाराच्या वर अधिकारी येथे प्रशिक्षण घेत असून सध्या जे वसतिगृह उपलब्ध आहे त्यात केवळ ३५० प्रशिक्षणार्थींना राहण्याची क्षमता आहे.