मारन यांची सहा दिवस चौकशी होणार
By admin | Published: November 28, 2015 12:06 AM2015-11-28T00:06:31+5:302015-11-28T00:06:31+5:30
टेलिफोन एक्स्चेंजप्रकरणी चौकशी करण्यासाठी माजी दूरसंचारमंत्री दयानिधी मारन यांनी ३० नोव्हेंबरपासून सलग सहा दिवसांपर्यंत सीबीआयसमक्ष हजर राहावे
नवी दिल्ली : टेलिफोन एक्स्चेंजप्रकरणी चौकशी करण्यासाठी माजी दूरसंचारमंत्री दयानिधी मारन यांनी ३० नोव्हेंबरपासून सलग सहा दिवसांपर्यंत सीबीआयसमक्ष हजर राहावे, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.
मारन यांच्या अटकेला मिळालेल्या स्थगितीची मुदत वाढवून देताना न्या. टी.एस. ठाकूर यांच्या पीठाने हा आदेश दिला. सीबीआयद्वारे विचारण्यात येणाऱ्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर द्या आणि तपास संस्थेला सहकार्य करा, असे निर्देश न्यायालयाने मारन यांना दिले. या आदेशानुसार मारन यांना ३० नोव्हेंबर ते ५ डिसेंबरपर्यंत रोज सकाळी ११ वाजेपासून तर सायंकाळी ५ वाजेपर्यंत सीबीआय कार्यालयात उपस्थित राहावे लागेल, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
मारन यांनी चौकशीदरम्यान प्रश्नांना उत्तर देण्याचे टाळले आणि सहकार्य केले नाही तर तसे न्यायालयात येऊन सांगा, असे सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयला सांगितले आहे; परंतु मारन यांना सीबीआय कस्टडी रिमांड देण्यास मात्र न्यायालयाने स्पष्ट नकार दिला.
(वृत्तसंस्था)