मराठा आरक्षण : सर्वोच्च न्यायालयात क्युरेटिव्ह याचिका सूचिबद्ध करणार 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2023 02:54 PM2023-10-14T14:54:10+5:302023-10-14T14:54:55+5:30

सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या पीठासमोर शुक्रवारी महाराष्ट्र सरकारचे ज्येष्ठ विधिज्ञ मणिंदर सिंह यांनी उल्लेख केला. त्यावर ही याचिका लवकरच सूचिबद्ध केली जाईल, असे न्या. चंद्रचूड यांनी सांगितले. 

Maratha reservation Curative petition to be listed in Supreme Court | मराठा आरक्षण : सर्वोच्च न्यायालयात क्युरेटिव्ह याचिका सूचिबद्ध करणार 

मराठा आरक्षण : सर्वोच्च न्यायालयात क्युरेटिव्ह याचिका सूचिबद्ध करणार 

सुनील चावके -

नवी दिल्ली : मराठा आरक्षणाला घटनाबाह्य ठरविणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाविरोधात दाखल करण्यात आलेली क्युरेटिव्ह याचिका विचारात घेण्यासाठी लवकरच सूचिबद्ध करण्यात येईल, असे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी शुक्रवारी सांगितले. 

मराठा आरक्षण घटनाबाह्य ठरविणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या मे २०२१ च्या निकालाचा फेरविचार करण्यास सर्वोच्च न्यायालयाच्या पाच सदस्यीय घटनापीठाने जुलै २०२१ मध्ये नकार दिला होता. त्यामुळे मे २०२१ च्या निकालाविरोधात महाराष्ट्र शासनाकडून क्युरेटिव्ह याचिका दाखल करण्यात आली. 

सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या पीठासमोर शुक्रवारी महाराष्ट्र सरकारचे ज्येष्ठ विधिज्ञ मणिंदर सिंह यांनी उल्लेख केला. त्यावर ही याचिका लवकरच सूचिबद्ध केली जाईल, असे न्या. चंद्रचूड यांनी सांगितले. 

Web Title: Maratha reservation Curative petition to be listed in Supreme Court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.