'स्टॅच्यू ऑफ युनिटी'त मराठी भाषेला डावललं; तमीळ, उर्दू नावांमध्येही चुका

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2018 01:00 PM2018-10-31T13:00:35+5:302018-10-31T13:22:05+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगातील सर्वात उंच पुतळा साकारण्यासाठी मराठमोळ्या शिल्पकाराची मदत घेतली.

Marathi name dropped in 'Statue of Unity's board; Mistakes in Tamil, Urdu names | 'स्टॅच्यू ऑफ युनिटी'त मराठी भाषेला डावललं; तमीळ, उर्दू नावांमध्येही चुका

'स्टॅच्यू ऑफ युनिटी'त मराठी भाषेला डावललं; तमीळ, उर्दू नावांमध्येही चुका

Next

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचे अनावरण केले. हा जगातील सर्वात उंच पुतळा साकारण्यासाठी मराठमोळ्या शिल्पकाराची मदत घेतली. तसेच लोकार्पण सोहळ्यावेळी छत्रपती शिवरायांचे नावही मोदी यांनी घेतले खरे, परंतु पुतळ्याच्या खाली देश-विदेशातील भाषांमध्ये लिहिलेल्या पाटीवर मराठीचा विसर पडल्याचे दिसत आहे. 


केवडीया येथे नर्मदा नदीवर सरदार वल्लभभाई पटेल यांचा 182 मीटर उंचीचा पुतळा उभारण्यात आला आहे. ऐक्याचे प्रतीक (स्टॅच्यू ऑफ युनिटी) असे या पुतळ्याचे वर्णन मोदी यांनी करताना शिवरायांशी तुलना केली. मात्र, गुजरातला मराठीचे वावडे असल्याचे दिसत आहे. हा पुतळा मराठमोळे शिल्पकार राम सुतार यांनी साकारला आहे. 

महत्वाचे म्हणजे मोदी यांनी भाषणावेळी शिवरायांचा उल्लेख करून सरदार वल्लभभाई पटेल यांच्यामध्ये शिवरायांचे शौर्य होते, असा उल्लेख केला. 


या नावाच्या पाटीमध्ये हिंदी, बंगाली, उर्दू, तमिळ गुजरातीसह रशियन, फ्रेंच आणि चीनच्या भाषांचाही समावेश आहे. मात्र, शेजारच्या राज्यातील मराठी भाषेचा समावेश नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे. तसेच या पाटीमध्ये तमिळ आणि बंगाली भाषेतील नाव चुकले आहे. या पाटीवर एकूण 10 भाषा आहेत. 


 



 



 

Web Title: Marathi name dropped in 'Statue of Unity's board; Mistakes in Tamil, Urdu names

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.