सुरतेवर मराठी झेंडा, भाजपाच्या संगीता पाटील विजयी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2017 01:16 AM2017-12-19T01:16:06+5:302017-12-19T01:16:18+5:30
मराठी भाषिक मतदारांचे प्राबल्य असलेल्या लिंबायत मतदारसंघात भाजपाच्या उमेदवार संगीता राजेंद्रभाई पाटील विजयी झाल्या आहेत. त्यांनी काँग्रेस उमेदवार डॉ. रवींद्र पाटील यांचा ३१ हजार ९५१ मतांनी पराभव केला. संगीता पाटील यांचा हा सलग दुसरा विजय आहे.
मराठी भाषिक मतदारांचे प्राबल्य असलेल्या लिंबायत मतदारसंघात भाजपाच्या उमेदवार संगीता राजेंद्रभाई पाटील विजयी झाल्या आहेत. त्यांनी काँग्रेस उमेदवार डॉ. रवींद्र पाटील यांचा ३१ हजार ९५१ मतांनी पराभव केला. संगीता पाटील यांचा हा सलग दुसरा विजय आहे. लिंबायतमध्ये मराठी मतदारांचा टक्का लक्षणीय आहे. तो लक्षात घेऊनच भाजपा, काँग्रेस आणि शिवसेनेने मराठी उमेदवार रिंगणात उतरविले होते. शिवसेनेकडून सम्राट पाटील रिंगणात होते. परंतु, भाजपाच्या संगीता पाटील यांना ९३,५८५ मते मिळाली, तर सम्राट पाटील यांना चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. त्यांच्या पारड्यात ४,०७५ मते पडली. नोटाबंदी आणि जीएसटीमुळे व्यापारीवर्ग भाजपावर नाराज आहे आणि त्याचा फटका त्यांना सुरतमध्ये बसेल, असा अंदाज वर्तवला जात होता. परंतु, सुरतमधील १६ पैकी १४ जागा जिंकून भाजपाने विरोधकांना धक्का दिला आहे.