मराठवाड्यात शंभर अर्ज दाखल

By admin | Published: September 26, 2014 02:37 AM2014-09-26T02:37:38+5:302014-09-26T02:37:38+5:30

मराठवाड्यात विविध ठिकाणी गुरुवारी शंभर उमेदवारी अर्ज दाखल झाले़ औरंगाबादेत गुरुवारी उमेदवारी भरण्यासाठी इच्छुकांनी भाऊगर्दी केली

Marathwada has filed a hundred applications | मराठवाड्यात शंभर अर्ज दाखल

मराठवाड्यात शंभर अर्ज दाखल

Next

औरंगाबाद : मराठवाड्यात विविध ठिकाणी गुरुवारी शंभर उमेदवारी अर्ज दाखल झाले़ औरंगाबादेत गुरुवारी उमेदवारी भरण्यासाठी इच्छुकांनी भाऊगर्दी केली. जिल्ह्यातील नऊ विधानसभा मतदारसंघांत दिवसभरात ३२, तर शहरातील तीन मतदारसंघांत १५ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. परभणी जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघात गुरुवारी ३० उमेदवारी अर्ज दाखल झाले. जिंतूर मतदारसंघात आ.रामप्रसाद बोर्डीकर (काँग्रेस) यांच्यासह अन्य उमेदवारांचा समावेश आहे़ उस्मानाबाद जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघातून अठरा उमेदवारी अर्ज दाखल झाले़ उमरगा मतदारसंघात आठजणांनी १३, तुळजापूरमधून १७ जणांनी ५२, उस्मानाबादमध्ये ११ जणांनी २० तर परंडा मतदारसंघात ६ जणांनी १० अर्ज दाखल केले हिंगोली ६ उमेदवारांनी ८, लातूर ८ उमेदवारी अर्ज दाखल झाले़

Web Title: Marathwada has filed a hundred applications

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.