मराठवाड्याच्या अनुदानाची रक्कम कागदावरच (पान पाचसाठी. एक कॉलम ज्येष्ठ गांधीवादी कार्यकर्त्या सरदेसाई बातमीच्या जागी घेणे)
By Admin | Published: September 4, 2015 10:44 PM2015-09-04T22:44:57+5:302015-09-04T22:44:57+5:30
>८६ कोटींची मागणी : टँकरचा पाणीपुरवठा अडचणीत येण्याची शक्यता औरंगाबाद : मराठवाड्यातील टंचाईच्या निवारणासाठी एप्रिल ते जून कालावधीसाठी ८६ कोटी ६६ लाख रुपयांच्या अनुदानाची मागणी विभागीय प्रशासनाने केली आहे. मात्र त्यातील एक छदामही शासनाकडून आलेला नसल्यामुळे टँकर पाणी पुरवठ्यावर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.तीन वर्षांपासून मराठवाडा दुष्काळग्रस्त आहे. त्यामुळे टंचाईवर मात करण्यासाठी अनुदानाची मागणी केली जात आहे. विभागातील प्रत्येक जिल्ह्याने एप्रिल ते जून २०१५ कालावधीसाठी टंचाई निवारणाकरिता सरकारकडे ८६ कोटी ६६ लाख रुपयांची मागणी केली आहे. गेल्या महिन्यात दोन महत्त्वाच्या बैठका मराठवाड्याच्या दुष्काळाच्या अनुषंगाने झाल्या. मुख्यमंत्र्यांनी तीन दिवस बीड, उस्मानाबाद, लातूर, परभणी जिल्ह्यांतील परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतरही टंचाई निवारण्यासाठी तातडीने निधी जाहीर झालेला नाही. त्यामुळे इतर खर्चातून नियोजन करण्याची वेळ आली आहे. (प्रतिनिधी)-------------------------------विद्यार्थ्यांचा आज मूकमोर्चादुष्काळी परिस्थितीमुळे विद्यापीठाच्या परीक्षेचे शुल्क भरण्याइतकेही पैसे पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांकडे नाहीत. त्यामुळे परीक्षा शुल्क माफ करण्याच्या मागणीसाठी शनिवारी शिक्षक दिनी विद्यार्थी विद्यापीठात मूकमोर्चा काढून कुलगुरूंना त्याबाबत निवेदन देणार आहेत. ----------------------