नवा व्हायरस, वाढलं टेन्शन! अनेक देशांची झोप उडवणाऱ्या आजाराची जाणून घ्या लक्षणं
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2023 14:54 IST2023-02-18T14:47:00+5:302023-02-18T14:54:28+5:30
जागतिक आरोग्य संघटनेने इक्वेटोरियल गिनीमध्ये मारबर्ग विषाणूचा उद्रेक झाल्याचे स्पष्ट केले आहे. 'इबोलाशी संबंधित हा विषाणू पश्चिम आफ्रिकेतील गिनी या छोट्या देशात परसला आहे.

नवा व्हायरस, वाढलं टेन्शन! अनेक देशांची झोप उडवणाऱ्या आजाराची जाणून घ्या लक्षणं
जागतिक आरोग्य संघटनेने इक्वेटोरियल गिनीमध्ये मारबर्ग विषाणूचा उद्रेक झाल्याचे स्पष्ट केले आहे. 'इबोलाशी संबंधित हा विषाणू पश्चिम आफ्रिकेतील गिनी या छोट्या देशात परसला आहे.आतापर्यंत या विषानुमुळे किमान 9 जाणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे, अशी माहिती डब्लूएचओने दिली आहे. डब्ल्यूएचओने सेनेगलमधील प्रयोगशाळेत गिनीमधून घेतलेल्या नमुन्यांची चाचणीनंतर मारबर्ग महामारीची पुष्टी केली. 'मारबर्ग हा अत्यंत संसर्गजन्य आहे. विषुववृत्तीय गिनीच्या अधिकार्यांनी रोगाची पुष्टी करण्यासाठी जलद आणि निर्णायक कारवाई केल्याबद्दल धन्यवाद, असं डब्ल्यूएचओचे आफ्रिकेचे प्रादेशिक संचालक डॉ. मतशिदिसो मोएती म्हणाले.
"मारबर्गचा लवकरात लवकर शोध घेतल्याने आपत्कालीन प्रतिसाद त्वरीत सुरू होऊ शकतो, ज्यामुळे आम्ही जीव वाचवू शकतो आणि शक्य तितक्या लवकर विषाणूचा प्रसार रोखू शकतो," मारबर्ग विषाणू रोग हा एक अत्यंत विषाणूजन्य रोग आहे, ज्यामुळे रक्तस्त्राव होतो. ताप येतो, यामुळे मृत्यू दर 88% पर्यंत आहे.
भारतीय कर्मचाऱ्यांना मस्क यांचा धक्का; ट्विटरच्या ३ पैकी दाेन कार्यालयांना टाळे
इबोलाप्रमाणे, मारबर्ग विषाणूचा वटवाघळांमधून आला. मारबर्ग विषाणूमुळे होणारा रोग अचानक सुरू होतो, तीव्र ताप, तीव्र डोकेदुखी आणि तीव्र अस्वस्थता. अनेक रुग्णांना सात दिवसांच्या आत गंभीर रक्तस्रावाची लक्षणे दिसतात.
मारबर्ग संसर्गावर उपचार करण्यासाठी कोणतीही अधिकृत लस किंवा औषधे उपलब्ध नाहीत,पण लक्षणे कमी करण्यासाठी औषध काम करु शकतात.