३० मार्चपासून मोदी परदेश दौऱ्यावर

By admin | Published: February 29, 2016 03:03 AM2016-02-29T03:03:12+5:302016-02-29T03:03:12+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी ३० मार्चपासून बेल्जियम, सौदी अरेबिया व अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार आहेत. अमेरिकेत अणुसुरक्षा परिषदेत मोदी सहभागी होतील

From March 30, Modi travels abroad | ३० मार्चपासून मोदी परदेश दौऱ्यावर

३० मार्चपासून मोदी परदेश दौऱ्यावर

Next

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी ३० मार्चपासून बेल्जियम, सौदी अरेबिया व अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार आहेत. अमेरिकेत अणुसुरक्षा परिषदेत मोदी सहभागी होतील. या परिषदेत पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्यासह ५० देशांचे नेते सहभागी होणार आहेत.
येत्या ३० मार्चपासून मोदींच्या विदेश दौऱ्यास सुरुवात होईल. भारत-ईयू परिषदेत सहभागी होण्यासाठी ते सर्वप्रथम बेल्जियमला जातील. ३१ मार्चला ते वॉशिंग्टन येथे अणुसुरक्षा परिषदेत भाग घेतील.
यानंतर २ एप्रिलला द्विपक्षीय चर्चेसाठी सौदी अरेबियाच्या दोनदिवसीय दौऱ्यावर रवाना होतील. तूर्तास सौदी अरेबिया व इराणमधील तणावपूर्ण संबंध बघता, मोदींचा हा दौरा महत्त्वपूर्ण मानला जात आहे. सौदी अरेबियाकडून भारताला सर्वाधिक कच्च्या तेलाचा पुरवठा होतो. भारताच्या गरजेचे सुमारे २० टक्के कच्चे तेल सौदी अरबमधून
येते.

Web Title: From March 30, Modi travels abroad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.