(मारिया ब्रीफींग, बातमीतले अपडेट)

By Admin | Published: August 29, 2015 12:20 AM2015-08-29T00:20:47+5:302015-08-29T00:20:47+5:30

(Maria Briefing, News Updates) | (मारिया ब्रीफींग, बातमीतले अपडेट)

(मारिया ब्रीफींग, बातमीतले अपडेट)

googlenewsNext
>(मारिया ब्रीफींग, बातमीतले अपडेट)

शीना बोराची हत्या केल्याची कबुली आरोपी संजीव कुुमारने पोलिसांना दिली. शुक्रवारी न्यायालयाने पोलीस कोठडीत धाडल्यानंतर खन्नाच्या चौकशीसाठी खुदद राकेख मारिया अनेक तास खार पोलीस ठाण्यात ठाण मांडून होते. मारियांनी केलेल्या चौकशीत शीनाची हत्येशी संबंधीत सर्व बारिक सारिक माहिती खन्नाने उघड केल्याचे समजते. त्यामुळे या हत्याकांडातील मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जीचा सहभाग आणि हत्येचा हेतूही स्पष्ट झाल्याचे समजते.
रात्री अकराच्या सुमारास चौकशी आटोपून खार पोलीस ठाण्याबाहेर पडलेले मारिया म्हणाले, तिसर्‍या आरोपीने(संजीव खन्ना) गुन्यातील सहभागाची कबुली दिली आहे. याशिवाय शीनाचा सख्खा भाऊ मिखेल बोरा यानेही तपासाला उपयुक्त ठरेल अशी माहिती पुरवली असून त्याची शहानिशा सुरू आहे, असेही त्यांनी सांगितले.
खार पोलिसांनी आतापर्यंतच्या तपासात मुख्य आरोपी इंद्राणीने शीनाच्या अस्तित्वाबाबत पसरविलेल्या थापेबाबत आणखी एक भक्कम पुरावा मिळवला आहे. देहराहूनला तपाससाठी गेलेल्या खार पोलिसांच्या हाती शीनाचा पासपोर्ट लागला आहे. त्यावरून शीना अमेरिकेत आहे हे सर्वांना पटवून देणारी इंद्राणी खोटे बोलत होती, हे स्पष्ट होते, असे मारिया सांगतात.
दरम्यान, रायगडच्या पेण तालुक्यातील गादोदे गावातून शुक्रवारी खार पोलिसांना सापडलेले मृतदेहाचे अवशेष उद्या वैद्यकीय तपासणीसाठी कलिना येथील प्रयोग शाळेत धाडण्यात येणार आहेत, असे मारिया यांनी संागितले.
हत्येच्या काही महिन्यांआधी देहरादून येथे शीना व राहुल मुखर्जी यांचा साखरपुडा पार पडल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. शीनाची हत्या ओपेल कोर्सा कारमध्ये घडली. २४ एप्रिल २०१२ रोजी इंद्राणीने तिला डीनरचे निमित्त करून वांद्रयात बोलावून घेतले होते. त्यावेळी पीटर लंडनमध्ये होते, अशी महत्वपूर्ण माहिती संजीवच्या चौकशीतून पुढे आल्याची माहिती सूत्रांकडून मिळते.


महत्वाचा बॉक्स
अप्पर आयुक्त वादाच्या भोवर्‍यात
२०१२मध्ये गोदादे खिंडीत सापडलेल्या मृतदेहाबाबत पेण पोलिसांनी डायरी एन्ट्री केली. मात्र तत्कालिन पोलीस अधिक्षकांच्या सूचनेनुसार पुढील तपास/कारवाई बंद करण्यात येत आहे, असे टीपण त्या डायरीवर सापडल्याची माहिती मिळते. अशा सूचना देणारा रायगडचे तत्कालिन अधिक्षक सध्या मुंबईत अप्पर आयुक्त म्हणून नेमणुकीस आहेत. याबाबत खातरजमा केली जाईल, अशी प्रतिक्रिया महासंचालक संजीव दयाळ यांनी माध्यमांना दिली आहे.

Web Title: (Maria Briefing, News Updates)

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.