मार्क झुकेरबर्ग आज पंतप्रधानांना भेटणार
By admin | Published: October 10, 2014 06:01 AM2014-10-10T06:01:09+5:302014-10-10T06:01:09+5:30
इंटरनेटची कनेक्टिव्हिटी वाढली पाहिजे यावर भर देताना फेसबुकचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकेरबर्ग यांनी इंटरनेट वापरण्याचा खर्च परवडणारा असावा
Next
नवी दिल्ली : इंटरनेटची कनेक्टिव्हिटी वाढली पाहिजे यावर भर देताना फेसबुकचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकेरबर्ग यांनी इंटरनेट वापरण्याचा खर्च परवडणारा असावा, असे येथे गुरुवारी सांगितले. इंटरनेट फक्त धनवंत आणि समाजातील शक्तिशाली लोकांपर्यंत मर्यादित राहू नये, असे झुकेरबर्ग यांनी म्हटले. झुकेरबर्ग यांच्या म्हणण्यानुसार ग्रामीण भारतात इंटरनेटची कनेक्टिव्हिटी वाढविण्यासाठी फेसबुक व्यापक स्तरावर काम करीत आहे. भारत हा अमर्याद गुणवत्ता असलेला देश आहे. या देशात मोठ्या महत्त्वाकांक्षा आहेत, असे त्यांनी सांगितले. झुकेरबर्ग शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटणार आहेत. (लोकमत न्यूज नेटवर्क)