अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर बाजारात उत्साह, सेन्सेक्स २६ हजारांपार
By Admin | Published: July 7, 2014 11:28 AM2014-07-07T11:28:32+5:302014-07-07T11:30:23+5:30
पहिल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजारात उत्साहाचे वातावरण असून मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्स या निर्देशांकाने २६ हजारांचा विक्रमी टप्पा पार केला
ऑनलाइन टीम
मुंबई, दि. ७ - मोदी सरकारच्या पहिल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजारात उत्साहाचे वातावरण असून मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्स या निर्देशांकाने २६ हजारांचा विक्रमी टप्पा पार केला. सोमवारी सकाळी बाजार उघडताच सेन्सेक्सने २६,०७४ चा आकडा गाठला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टी हा निर्देशांक ७ हजार ७७९वर पोचला. निर्देशांकात आज बाजार सुरू होताच १२८ अंशांची वाढ पहायला मिळाली.