मार्केट लिलावाच्या ठरावास विरोध व्यापारी पोहोचले जगवाणींच्या निवास्थानी: रविवारी पालकमंत्र्यांची घेणार भेट
By admin | Published: January 31, 2016 12:15 AM2016-01-31T00:15:59+5:302016-01-31T00:15:59+5:30
जळगाव : मनपाच्या मालकीच्या जागेवरील १४ मार्केटमधील गाळ्यांच्या ऑनलाईन (ई-निविदा) पद्धतीने लिलावाचा ठराव बुधवारी झालेल्या विशेष महासभेत मंजूर करण्यात आला होता. लिलावाच्या या पद्धतीस विरोध दर्शवत मार्केटमधील व्यापारी सकाळी ११.३० वाजता आमदार डॉ. गुरुमुख जगवाणी यांच्या निवास्थानी पोहोचले. याप्रश्नी रविवारी पालकमंत्री एकनाथराव खडसे यांना भेटून निवेदन देण्याचा निर्णय व्यापार्यांनी घेतला.
Next
ज गाव : मनपाच्या मालकीच्या जागेवरील १४ मार्केटमधील गाळ्यांच्या ऑनलाईन (ई-निविदा) पद्धतीने लिलावाचा ठराव बुधवारी झालेल्या विशेष महासभेत मंजूर करण्यात आला होता. लिलावाच्या या पद्धतीस विरोध दर्शवत मार्केटमधील व्यापारी सकाळी ११.३० वाजता आमदार डॉ. गुरुमुख जगवाणी यांच्या निवास्थानी पोहोचले. याप्रश्नी रविवारी पालकमंत्री एकनाथराव खडसे यांना भेटून निवेदन देण्याचा निर्णय व्यापार्यांनी घेतला. मनपा मालकीच्या काळ्यांबाबत निर्णयासाठी गेल्या बुधवारी विशेष महासभा झाली होती. मनपा कालकीच्या शहरातील विविध भागात असलेल्या १४ गाळ्यांच्या विषयावर सविस्तर चर्चा होऊन या गाळ्यांच्या ऑनलाईन (ई-निविदा) पद्धतीने लिलावाचा ठराव विशेष महासभेत मंजूर करण्यात आला. त्यासाठी यापूर्वी मंजूर केलेल्या ठराव क्र.१३५ मध्ये नगररचना विभागाने रेडिरेकनरच्या वेटेड दराने काढलेली किंमत हीच बेस व्हॅल्यू (लिलावाच्या बोलीची किंमत) धरली जाणार आहे. व्यापारी एकवटलेया ठरावाविरोधात आता व्यापारी एकवटले आहेत. सकाळी ११.३० वाजेच्या दरम्यान छत्रपती शाहू मार्केट मधील व्यापारी संघटचे अध्यक्ष डॉ. शांताराम सोनवणे, फुले मार्केट असो. चे रमेश मताणी, राजस कोतवाल, तेजस देपुरा, चौबे मार्केट असो.चे अशोक बारी, भास्कर मार्केटचे संजय पाटील यांच्यासह विविध संघटनांची पदाधिकारी आमदार डॉ. गुरुमुख जगावणी यांच्या निवास्थानी गेले होते. १० मार्केटच्या विषयावर चर्चाशहरातील १० व्यापारी संकुले अशी आहेत की तेथे फारसा व्यापारही नाही. रामलालजी चौबे मार्केट, भोईटे मार्केट, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्केट, छत्रपती शाहू मार्केट, शिवाजीनगर रुग्णालयाजवळील दुकाने, भास्कर मार्केट, लाठी शाळेतील हॉल, नानीबाई अग्रवाल मार्केट, श्यामाप्रसाद उद्यानाजवळील मार्केट, जुने शाहू मार्केट या व्यापारी संकुलांबाबत ठराव क्रमांक १३५ मध्ये उल्लेख आहे की ही संकुले सामाजिक दृष्टीने बांधण्यात आली आहेत. अत्यंत छोट्या व हातावर काम करणार्या गाळेधारकांचा यात समावेश आहे. त्यामुळे या मार्केटचा समावेश अव्यावसायिक गटात करण्यात यावा. मनपा ठरवेल त्यानुसार त्यांना स्थान निहाय सूट देण्यात देण्याचे या ठरावात नमूद होते. या संकुलांचाही नव्या ठरावात काही उल्लेख नसल्याचे यावेळी डॉ. शांताराम सोनवणे यांनी लक्षात आणून दिले. नव्या ठरावांची अंमलबजावणी झाल्यास हे व्यावसायिक उद्ध्वस्त होतील असेही ते म्हणाले. -----