शहीदाच्या पत्नीकडे मागितलं विवाह प्रमाणपत्र

By admin | Published: June 3, 2017 01:22 PM2017-06-03T13:22:28+5:302017-06-03T13:22:28+5:30

हरियाणा पोलिसात कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत असलेल्या मनदीप यांच्या पत्नी प्रेरणा यांनी हरियाणा सरकार आपल्या पतीचं हौतात्म्य विसरुन अपमानजक प्रश्न विचारत असल्याचा आरोप केला आहे

Marriage certificate sought by the martyr's wife | शहीदाच्या पत्नीकडे मागितलं विवाह प्रमाणपत्र

शहीदाच्या पत्नीकडे मागितलं विवाह प्रमाणपत्र

Next
>ऑनलाइन लोकमत
हरियाणा, दि. 3 - जम्मू काश्मीरमधील कुपवाडा येथे शहीद झालेले कुरुक्षेत्र जिल्ह्याचे मनदीप सिंह यांच्या कुटुंबाने हरियाणा सरकारविरोधात आवाज उठवला आहे. हरियाणा पोलिसात कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत असलेल्या मनदीप यांच्या पत्नी प्रेरणा यांनी हरियाणा सरकार आपल्या पतीचं हौतात्म्य विसरुन अपमानजक प्रश्न विचारत असल्याचा आरोप केला आहे. काही दिवसांपुर्वी जिल्हा सैनिक बोर्डाने पत्र पाठवून प्रेरणा आपल्या शहीद पतीचा भाऊ संजीव कुमारसोबत लग्न करणार आहे का ? किंवा भविष्यात करण्याची योजना आहे का ? असे अपमानजक प्रश्न विचारत असल्याचा आरोप कुटुंबाने केला आहे. 
 
आम्ही आधीच अनेक समस्यांना सामोरे जात असताना, अशा प्रकारचे प्रश्न विचारुन आमचा अपमान केला जात असल्याचं कुटुंबाने सांगितलं आहे. आपण प्रामाणिकपणे आपली नोकरी करत असूनही आपल्यावर संशय घेतला जात असल्याचं प्रेरणा यांचं म्हणणं आहे. इतकंच नाही तर सरकार प्रेरणा यांच्याकडे पतीच्या भावासोबत लग्न न केल्याचं तसंच भविष्यात करणार नाही याचं शपथपत्र मागत आहे. एका महिलेला असा प्रश्न विचारणं तिचा अपमान असून तिच्या शहिद पतीच्या हौतात्म्याचाही अपमान असल्याचं प्रेरणा यांनी सांगितलं आहे. 
 
दिल्लीत जाऊन पंतप्रधान कार्यालयात आवाज उठवल्यानंतर कुठे आपल्याला 50 लाख रुपये दिले गेले असं कुटुंबाचं म्हणणं आहे. आमच्या कुटुंबात कोणताच वाद नसल्याचंही प्रेरणा यांनी सांगितलं आहे. जिल्हा सैनिक बोर्डाचे अधिकारी आपल्याला वारंवार त्रास देत असल्याचा आरोप प्रेरणा यांनी केला आहे. महत्वाचं म्हणजे गुरुवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हरियाणा सरकारने शहीद मनदीप सिंह यांचा भाऊ संजीव कुमारला नोकरी देण्याची घोषणा केली आहे. यानंतर 24 तासातच प्रेरणा यांनी हरियाणा सरकारविरोधात आवाज उठवला आहे. 
 
28 ऑक्टोबर 2016 रोजी जम्मू काश्मीरमधील कुपवाडा येथील माछिल सेक्टरमध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात कॉन्स्टेबल मनदीप सिंह शहीद झाले होते. दहशतवाद्यांनी त्यांच्या मृतदेहाची विटंबना केली होती. यानंतर त्यांची पत्नी प्रेरण यांनी पोलीस उपनिरीक्षकाची नोकरी देण्यात आली. त्यांना पोलीस निरीक्षक म्हणून बढती आणि संजीव कुमार यांना नोकरी देण्याचं आश्वासनही देण्यात आलं होतं. मात्र असं काही झालं नाही आणि आता जिल्हा सैनिक बोर्ड त्यांच्याकडे संजीव कुमारसोबत लग्न न केल्याचा पुरावा मागत आहे. 
 

Web Title: Marriage certificate sought by the martyr's wife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.