कविता, संगीता, पूजा आणि पिंकी…सगळ्यांचा नवरा संदीप; तरुणींना फसवणाऱ्याला ठोकल्या बेड्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2022 14:07 IST2022-10-10T13:43:12+5:302022-10-10T14:07:38+5:30
लग्नाचे आमिष दाखवून तरुणींवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

कविता, संगीता, पूजा आणि पिंकी…सगळ्यांचा नवरा संदीप; तरुणींना फसवणाऱ्याला ठोकल्या बेड्या
कविता, संगीता, पूजा आणि पिंकी… या सर्वांच्या नवर्याचे नाव संदीप गोदरा. तुम्ही म्हणाल, हे कसे शक्य आहे. पण, ही एखाद्या चित्रपटाची कथा नसून, राजस्थानमधील सीकर येथे घडलेली खरी घटना आहे. एका विवाहित महिलेवर झालेल्या बलात्कार प्रकरणात पोलिसांनी एका व्यक्तीचे कारनामे समोर आणले. आरोपीने एकाच वेळी 10 पेक्षा जास्त मुलींसोबत लग्न केल्याचे तपासात उघड झाले आहे.
मुलींना लग्नाचे आमिष द्यायचा
पोलिसांनी सांगितल्यानुसार, आरोपीच्या टार्गेटवर कधी घटस्फोटित महिला असायच्या तर कधी मोठ्या श्रीमंत घरातील मुलींना तो टार्गेट करायचा. या नराधमाने 10 हून अधिक मुली व महिलांना आपल्या जाळ्यात अडकवून लग्नाचे आमीष दाखवले आणि त्यांच्यावर बलात्कार केल्याचे तपासात समोर आले आहे. पोलिसांनी लोकेशन ट्रेस करून आरोपी संदीप गोदाराला जयपूरच्या ट्रायटन मॉलमधून अटक केली.
सोशल मीडियावरुन टार्गेट शोधायचा
सीकर पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. पोलिसांच्या चौकशीत आरोपीचे किस्से ऐकून सगळेच अवाक् झाले. आणखी काही महिला समोर आल्यानंतर या प्रकरणात विविध खुलासे होत आहेत, तसेच पीडित महिला आरोपीविरोधात तक्रार दाखल करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संदीप हा एनजीओ, सोशल मीडिया आणि खोट्या आश्वासनांचा वापर करून मुलींना फसवत असे. सोशल मीडियाच्या माध्यमातून तो आपले टार्गेट शोधायचा.
इमोशनल ब्लॅकमेल करून अत्याचार करायचा
संदीप मुलींना लुटण्यासाठी थेट पैशांची मागणी करत नव्हता. तो एका मुलीकडून 15 ते 20 हजार रुपये उसने घ्यायचा आणि पटकन परत करायचा. यातून तो मुलींचा विश्वास संपादन करत असे. एखाद्या मुलीने पैसे देण्यास नकार दिल्यानंतर तो आत्महत्या करण्याची धमकी द्यायचा. तो स्वतः फासावर लटकलेले फोटो, झोपेच्या गोळ्यांचे फोटो मुलींना पाठवून इमोशनल ब्लॅकमेल करायचा. अशाप्रकारे त्याने अनेक मुलींना आपल्या जाळ्यात ओढले. (सर्व महिला-तरुणींची नावे बदलेली आहेत.)