सोशल डिस्टंन्सिंग धुडकावून देवेगौडांच्या नातवाचा विवाह

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2020 05:23 AM2020-04-18T05:23:36+5:302020-04-18T05:24:11+5:30

शंभरपेक्षा जास्त वºहाडी; बाहेरील कुणीही नव्हते -कुमारस्वामी

The marriage of the grandson of Deve Gowda to social distancing of son of kumarswamy in benglore | सोशल डिस्टंन्सिंग धुडकावून देवेगौडांच्या नातवाचा विवाह

सोशल डिस्टंन्सिंग धुडकावून देवेगौडांच्या नातवाचा विवाह

googlenewsNext

बंगळुरू : देशात कोरोना विषाणूला रोखण्यासाठी लॉकडाऊन असतानाही कर्नाटकमध्ये गुरुवारी सकाळी माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांचा नातू निखिल कुमारस्वामी यांचे लग्न पार पडले. प्रसिद्ध झालेल्या छायाचित्रांतून ना सोशल डिस्टंन्सिंग पाळले गेले ना उपस्थितांनी मास्क वापरल्याचे दिसले किंवा लग्नविधींत इतर आवश्यक खबरदारी घेतल्याचेही दिसले नाही. वधू ही काँग्रेसचे नेते व माजी मंत्र्याच्या पुतण्याची मुलगी आहे.

बंगळुरूपासून २८ किलोमीटरवरील फार्महाऊसवर हे लग्न लागले. लग्नात दोन राजकीय कुटुंबांतीलच लोक होते व बाहेरील कोणीही नव्हते, असा दावा राज्याचे माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी केला. रमणगारा येथील फार्महाऊसवर १०० पेक्षा जास्त लोक उपस्थित होते. वधू आणि वर यांनी एकमेकांना हार घातले आणि पुरोहित व देवे गौडा उपस्थित असल्याचे दिसले. (वृत्तसंस्था)

४२ वाहनांसाठी दिले होते पास
च्कुमारस्वामी यांनी लग्नाला कुटुंबातील फक्त ६० ते ७० लोक उपस्थित असतील, असा दावा केला होता. मात्र, कर्नाटक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ४२ वाहने व १२० लोकांसाठी पासेस दिले गेले. सोशल डिन्स्टन्सिंगच्या सूचना पाळताना कोणी दिसले नाही, प्रत्येक जण एकमेकांच्या जवळ दिसत होता.
 

Web Title: The marriage of the grandson of Deve Gowda to social distancing of son of kumarswamy in benglore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.