लग्नाच्या 4 महिन्यांनंतर पत्नीला प्रियकराकडे सोडून आला नवरा; सासरे म्हणतात, आता हुंडा पण परत द्या

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2022 04:06 PM2022-04-27T16:06:04+5:302022-04-27T16:14:52+5:30

मुलीच्या वडिलांनी चार महिन्यांपूर्वी लेकीचं शाहबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या शिवा नावाच्या तरुणासोबत लग्न झालं होतं.

marriage husband wife left lover house allegation of dowry rampur uttar pradesh | लग्नाच्या 4 महिन्यांनंतर पत्नीला प्रियकराकडे सोडून आला नवरा; सासरे म्हणतात, आता हुंडा पण परत द्या

लग्नाच्या 4 महिन्यांनंतर पत्नीला प्रियकराकडे सोडून आला नवरा; सासरे म्हणतात, आता हुंडा पण परत द्या

googlenewsNext

नवी दिल्ली - उत्तर प्रदेशच्या रामपूरमध्ये एक हैराण करणारी घटना समोर आली आहे. एका व्यक्तीने लग्नानंतर अवघ्या चार महिन्यांत आपल्या पत्नीला प्रियकराच्या घरी सोडलं आहे. मात्र लग्नात मिळालेला हुंडा परत केलेला नाही. मुलीच्या वडिलांनी चार महिन्यांपूर्वी लेकीचं शाहबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या शिवा नावाच्या तरुणासोबत लग्न झालं होतं. लग्नात जावयाला खूप हुंडा देखील दिला होता. पण मुलगी आणि जावई याच्यामध्ये विविध कारणांवरून वाद सुरू झाला असं म्हटलं आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, अजीमनगर पोलीस ठाणे परिसरात एका गावात ही अजब घटना घडली आहे. तरुणाला त्याच्या पत्नीचे लग्नाआधी एका तरुणासोबत प्रेमसंबंध होते याची माहिती मिळाली. हे ऐकून तो प्रचंड संतापला. त्याने आपल्या पत्नीला आपल्याला एका लग्नाला जाण्यासाठी तयार हो असं सांगितलं आणि रस्त्यात तिला तिच्या प्रियकराच्या गावी सोडलं. अनेकदा मालिका चित्रपटात अशा घटना घडतात. पण प्रत्यक्षात असं घडल्याने कुटुंबीयांना देखील मोठा धक्का बसला आहे. 

मुलीचे वडील चंद्रपाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, समाजात यामुळे खूप अपमान झाला आहे. कष्टाचे पैसे खर्च करून मुलीला हुंडा दिला होता. पण आता जावई तो हुंडा परत करत नाही आणि तो मुलीला देखील प्रियकराकडे सोडून गेला आहे. त्यांना तो हुंडा परत पाहिजे आहे जेणेकरून ते या पैशातून दुसऱ्या मुलीचं लग्न लावून देतील. जर आपल्या मुलीला सोडलं आहे. तर मग आता हुंडा देखील परत दिला पाहिजे. चंद्रपाल यांनी जावयाकडे याची मागणी केली पण त्यांना परत पाठवण्यात आलं. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: marriage husband wife left lover house allegation of dowry rampur uttar pradesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :marriageलग्न