घटस्फोट न घेता दुसरं लग्न केलं, मुलगी झाली... तरीही पहिल्या पतीकडून घेतली पोटगी, सरकारी योजनेने केला भांडाफोड
By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2024 11:09 AM2024-09-23T11:09:35+5:302024-09-23T11:18:08+5:30
मध्य प्रदेशातील एका महिलेची फसवणुकीची घटना समोर आली आहे. ही फसवणूक एका सरकारच्या योजनेमुळे उघड झाली आहे.
मध्य प्रदेशमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, खंडवा येथे एका पत्नीने पहिल्या पतीला घटस्फोट न देता दुसरे लग्न केले. दोघांनाही एक मुलगी झाली. पण तिने तिच्या पहिल्या पतीकडूनही पोटगी घेणे सुरू ठेवले होते. या गोष्टीची माहिती पतीला मिळाली. यानंतर त्याने कोर्टात धाव घेतली, त्यांनी या प्रकरणाचे न्यायालयात पुरावे सादर केले. त्यात सरकारी योजनेचाही समावेश होता. सरकारी योजनेचे पुरावे पाहून कोर्टाने पोटगी भत्ता देण्याचा या आधाचा निर्णय बदलला.
धक्कादायक! UPSC ची तयारी करणाऱ्या युवकाचा मृतदेह जंगलात सापडला, हत्या की आत्महत्या?
या प्रकरणाचा निकाल देताना न्यायालयाने म्हटले की, पहिल्या पतीला घटस्फोट न देता दुसऱ्या पतीशी लग्न करणे आणि त्याला न कळवता त्यांच्याकडून पोटगी घेणे हा कायदेशीर गुन्हा आहे. याआधी आम्ही महिलेच्या बाजूने निकाल दिला होता की तिचा पहिला पती त्यांना पोटगी देईल. मात्र महिलेने कोणालाही न सांगता पुन्हा लग्न केले. तिला मुलगीही झाली. तरीही तिने आपल्या पहिल्या पतीकडून देखभाल भत्ता घेणे सुरूच ठेवले. त्यामुळे आता त्यांचा देखभाल भत्ता बंद करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,मध्य प्रदेशातील सिहोर जिल्ह्यातील बडियाखेडी येथील संदीप (३७) याने पत्नी सोनू आणि तिचा दुसरा पती नरेंद्र, किरार मोहल्ला गाव रसीदपुरा तहसील- पांधणा यांच्या विरोधात कौटुंबिक न्यायालयात अर्ज दाखल केला होता. संदीपने यांनी सांगितले की, मी १२ डिसेंबर २०१८ पासून सोनू यांना दरमहा २५०० रुपये देखभाल भत्ता देत आहे. त्यावेळी औपचारिक घटस्फोट न घेता, तिने फेब्रुवारी २०२० मध्ये नरेंद्र प्यारेलाल यांच्याशी दुसरे लग्न केले. त्यांना एक मुलगीही आहे.
पत्नी नसतानाही महिन्याला २५०० रुपयांचे १६ हप्ते वसूल केले जात असल्याचा आरोप संदीप यांनी केला. १२ फेब्रुवारी २०२० रोजी सोनू यांनी नरेंद्र प्यारेलालशी लग्न केले तोपर्यंत ५१,२५० रुपये दिले होते. दुसऱ्या लग्नानंतर सोनूने एका मुलीला जन्म दिला. सोनूने आपल्या मुलीची महिला आणि बालविकास विभागात नोंदणी करून लाडली लक्ष्मीचा लाभ घेण्यास सुरुवात केली.या योजनेमुळे हे प्रकरण उघडकीस आले आहे.