भयंकर! लग्नानंतरची पहिली होळी साजरी करतानाच घडलं अघटित; नवदाम्पत्याच्या मृत्यूने खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2023 12:54 PM2023-03-09T12:54:33+5:302023-03-09T12:55:45+5:30
फेब्रुवारी महिन्यातच लग्न झाले होते आणि पहिली होळी साजरी करण्यासाठी पती विनोद देलनपूर सासरच्या घरी आले होते.
मध्य प्रदेशातील रतलामच्या डेलनपूरमध्ये होळीच्या आनंदावर शोककळा पसरली असून तलावात बुडून चार जणांचा मृत्यू झाला आहे. शेतातील सिंचनासाठी बनवलेल्या तलावात ही दुर्घटना घडली. या तलावात बुडून पती-पत्नी आणि पत्नीच्या दोन भावांना जीव गमवावा लागला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, होळी खेळत असताना पाय घसरल्याने एका तरुणाचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना बुधवारी दुपारी घडली.
एकाला वाचवण्यासाठी पती-पत्नी आणि त्याचा भाऊ एकापाठोपाठ एक तलावात बुडाले आणि चौघेही बुडले. चौघेही बुडताना पाहून आजूबाजूच्या लोकांनी तत्काळ ग्रामस्थ व पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच रतलामचे एसपी अभिषेक तिवारी आणि जिल्हाधिकारी नरेंद्र सूर्यवंशी हेही घटनास्थळी पोहोचले आणि बचाव मोहीम राबवून चारही मृतदेह तलावातून बाहेर काढून पोस्टमॉर्टमसाठी मेडिकल कॉलेजमध्ये पाठवले. औद्योगिक पोलीस स्टेशन या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करत आहे.
मृत दाम्पत्य विनोद कटारा (23) आणि रूपा (22) यांचे फेब्रुवारी महिन्यातच लग्न झाले होते आणि पहिली होळी साजरी करण्यासाठी पती विनोद देलनपूर सासरच्या घरी आले होते. जिथे ही घटना घडली त्या शेतावर त्याचे सासरे मजुरीचे काम करतात, मात्र पती-पत्नी दोघांनी मिळून जगाचा निरोप घेतला.
पत्नीचे दोन भाऊ लखन (22), किशोर (11) यांचाही तलावात बुडून मृत्यू झाला. मुख्यमंत्री शिवराज सिंह यांनीही उत्सवाच्या दिवशी झालेल्या दुर्घटनेबद्दल ट्विट करून शोक व्यक्त केला आहे. यासोबतच मुख्यमंत्र्यांनी मृतांच्या नातेवाईकांना 4 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"