अल्पवयीन मुलीशी लग्नाचा प्रयत्न फसला विवाहेच्छुक वधू-वर पोलिसांच्या ताब्यात : नाराज होऊन परतले वर्हाडी
By Admin | Published: January 5, 2016 12:27 AM2016-01-05T00:27:19+5:302016-01-05T00:27:19+5:30
सेंट्रल डेस्क व हॅलो ग्रामीणसाठी
स ंट्रल डेस्क व हॅलो ग्रामीणसाठीजळगाव- ३० वर्षाच्या मुलासोबत १५ वर्षांच्या मुलीचा विवाह होत असल्याचा एक निनावी फोन आल्यानंतर सोमवारी पोलिसांनी तानाजी मालुसरेनगरातील वडमायानजीक विवाह सोहळ्याचा प्रयत्न हाणून पाडला. पोलिसांनी विवाहेच्छुक वर आणि वधूस जबाब घेण्यासाठी शनिपेठ पोलिसात आणले. हे लग्न करू नका, अशी नोटीस वर आणि वधू पक्षाला बजावण्यात आली. तानाजी मालुसरेनगरातील वडमायानजीक हा विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता. किरण (नाव बदलले आहे) याचे लग्न चोपडा तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीशी निश्चित झाले होते. सोमवारी दुपारी १२ वाजता लग्न सोहळा पार पडणार होता. त्यासाठी किरणच्या घरानजीक मंडप उभारण्यात आला. रितीरिवाजानुसार हळदीचा कार्यक्रम झाला. तसेच वर आणि वधू पक्षाकडील सर्व पाहुणे मंडळी एकत्र आली. सोमवारी लग्नाची पूर्ण तयारी झाली. सकाळीच पोलिसात निनावी फोनहे लग्न होण्यापूर्वीच सकाळी १०.३० च्या सुमारास शनिपेठ पोलिसांना निनावी फोन आला. संबंधिताने आपले नाव सांगितले नाही, पण अल्पवयीन मुलीशी एका युवकाचे लग्न लावण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे संबंधित व्यक्तीने पोलिसांना फोनवर सांगितले. इऩ्फो-वर्हाडींची पोलीस स्टेशनमध्ये गर्दीफोनवरून मिळालेल्या माहितीनुसार शनिपेठ पोलीस ११ वाजेच्या सुमारास वडमायानजीक लग्न मंडपात पोहोचले. पोलीस उपनिरीक्षक पवन राठोड व इतर कर्मचार्यांनी प्राथमिक चौकशी केली नंतर वर आणि वधूस चौकशीसाठी ताब्यात घेतले व त्यांचे जबाब घेण्यात आले. प्राथमिक चौकशीत वधूचे वय १५ वर्षे असल्याचे समोर आले. पण अधिकच्या चौकशीसाठी वधूच्या वयाचा दाखला व इतर कागदपत्रे पोलिसांनी मागविली. चौकशी होईपर्यंत लग्न होणार नाही, अशा आशयाची नोटीस दोन्ही पक्षांच्या मंडळीला बजावण्यात आली. वरास मंडपातून चौकशीसाठी नेल्यामुळे वर आणि वधू पक्षाकडील मंडळी शनिपेठ पोलिसात दाखल झाली. यामुळे पोलीस ठाणयात मोठी गर्दी झाली होती. लग्न सोहळा रद्द करावा लागल्याने वर्हाडींना गावी परतावे लागले. इन्फो-हलाखीची परिस्थिती नियोजीत वधूची आर्थिक स्थिती नाजूक आहे. तिला वडील नाहीत. आई मजुरी करून उदरनिर्वाह करते. तर वर किरण हादेखील मजुरी करतो,अशी माहिती मिळाली. इन्फो-आठवडाभरातील दुसरा प्रकारअल्पवयीन मुलीच्या लग्नाचा हा दुसरा प्रकार उघडकीस आला. पांझरापोळ भागात २ जानेवारी रोजी भुसावळच्या मुलासोबत लग्न होणार होते. याबाबतही पोलिसांकडे तक्रार दाखल झाल्याने शनिपेठ पोलिसांनीविवाहरोखलाहोता.