विवाहित मुलीवर बलात्कार करणारा बाप दोषी आज शिक्षा सुनावणार : विळ्याचा धाक दाखवून केले होते बापाने कृत्य

By admin | Published: October 25, 2016 10:35 PM2016-10-25T22:35:05+5:302016-10-25T22:35:05+5:30

जळगाव: वारंवार विळ्याचा धाक दाखवून पोटच्या विवाहित मुलीवर बलात्कार करणार्‍या बापास न्यायालयाने दोषी धरले आहे. सुनील सीताराम जाधव (वय ४५ रा.जळगाव) असे बलात्कारी बापाचे नाव आहे. जिल्हा व सत्र न्या.कविता अग्रवाल या बुधवारी आरोपीला शिक्षा सुनावणार आहेत. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Married daughter raped, convicted, sentenced to death | विवाहित मुलीवर बलात्कार करणारा बाप दोषी आज शिक्षा सुनावणार : विळ्याचा धाक दाखवून केले होते बापाने कृत्य

विवाहित मुलीवर बलात्कार करणारा बाप दोषी आज शिक्षा सुनावणार : विळ्याचा धाक दाखवून केले होते बापाने कृत्य

Next
गाव: वारंवार विळ्याचा धाक दाखवून पोटच्या विवाहित मुलीवर बलात्कार करणार्‍या बापास न्यायालयाने दोषी धरले आहे. सुनील सीताराम जाधव (वय ४५ रा.जळगाव) असे बलात्कारी बापाचे नाव आहे. जिल्हा व सत्र न्या.कविता अग्रवाल या बुधवारी आरोपीला शिक्षा सुनावणार आहेत. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या घटनेची माहिती अशी की, एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहणारी पीडित हिचे लग्न झाल्यानंतर काही कारणास्तव पतीने तिला वागवण्यास नकार दिल्याने ती माहेरी अर्थात बापाकडे राहत होती. तिच्या राहण्याचा गैरफायदा उचलत विळ्याने मारण्याचा धाक दाखवून बापाने तिच्यावर वारंवार अत्याचार केले. २३ जून २०१४ रोजी संध्याकाळी पाच वाजता सुनील याने दारुच्या नशेत अंगलट करून मुलीवर बलात्कार केला. घाबरलेल्या अवस्थेत पीडितेने ही घटना शेजारी राहणार्‍या मिनाक्षी खैरनार व अन्य लोकांना सांगितली. या लोकांनी आरोपीला पकडून पोलीस स्टेशनला हजर केले. त्याच्यावर कलम ३७६-२, ३२३,५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
११ साक्षीदार तपासले
या गुन्‘ाचे तपासाधिकारी उपनिरीक्षक जगदीश देवरे यांनी न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले होते. आरोपीने गुन्हा नाकबुल केल्यानंतर गुन्हा सिध्द करण्यासाठी सरकार पक्षातर्फे ११ साक्षीदार तपासण्यात आले. त्यात पीडित मुलगी, डॉ.संदीप पाटील, मिनाक्षी खैरनार, मंगला बारी, तपासाधिकारी जगदीश देवरे यांचा प्रामुख्याने समावेश आहे. गुन्‘ातील दस्ताऐवजापैकी डीएनए रिपोर्ट महत्वाचा ठरला.
न्यायालयासमोर आलेले पुरावे ग्रा‘ धरत न्या.कविता अग्रवाल यांनी आरोपीला दोषी धरले. सरकार पक्षाची बाजू ऐकून घेतल्यानंतर बुधवारी न्यायालय शिक्षा सुनावणार आहे. घटनेच्या दिवसापासून आरोपी हा जिल्हा कारागृहात आहे. सरकारतर्फे ॲड. संभाजी जाधव, ॲड.नीलेश चौधरी तर आरोपीतर्फे ॲड.विजय दर्जी यांनी काम पाहिले.

Web Title: Married daughter raped, convicted, sentenced to death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.