विवाहित सरकारी अधिकाऱ्याने प्रेग्नंट गर्लफ्रेंडशी केलं लग्न, पहिल्या पत्नीनेही दिली साथ, कारण वाचून तुम्ही म्हणाल...
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2021 03:38 PM2021-09-04T15:38:18+5:302021-09-04T15:46:33+5:30
Marriage News: एका विवाहित गटशिक्षणाधिकाऱ्याचे लग्न प्रेग्नंट असलेल्या गर्लफ्रेंडसोबत झाले आहे. हे लग्न या अधिकाऱ्याच्या पहिल्या पत्नीच्या संमतीने झाले आहे.
रायपूर - छत्तीसगडमधील बिलासपूरमध्ये सध्या झालेल्या एका विवाहाची जोरदार चर्चा सुरू आहे. जिल्ह्यातील बिल्हा येथे एका विवाहित गटशिक्षणाधिकाऱ्याचे लग्न प्रेग्नंट असलेल्या गर्लफ्रेंडसोबत झाले आहे. हे लग्न या अधिकाऱ्याच्या पहिल्या पत्नीच्या संमतीने झाले आहे. या सरकारी अधिकाऱ्याच्या पहिल्या पत्नीला कुठलेही अपत्य होत नव्हते. त्यामुळे पहिल्या पत्नीने गटशिक्षणाधिकारी असलेल्या पतीच्या दुसऱ्या लग्नाला परवानगी दिली. गेल्या गुरुवारी तरखपूरमधील एका सतनाम भवनामध्ये सदर सरकारी अधिकारी आणि त्याच्या गर्लफ्रेंडचा विवाह झाला.
याबाबत मिळालेल्या चार दिवसांपूर्वी एक २४ वर्षीय तरुणी मुंगेरी येथील जरहागाव पोलीस ठाण्यात बिल्हाचे गटशिक्षणाधिकारी पवित्र सिंग बेदी यांच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यासाठी पोहोचली होती. गेल्या सात वर्षांपासून सदर अधिकारी आणि आपल्यात प्रेमसंबंध आहेत. तसेच या दरम्यान आमच्यात शारीरिक संबंधही प्रस्थापित झाले, त्यामुळे मी गर्भवती आहे, असा आरोप या तरुणीने केला. सदर तरुणी पोलीस ठाण्यात पोहोचल्याचे कळताच या सरकारी अधिकाऱ्याने लगबगीने पोलीस ठाण्यात धाव घेतली. तसेच तिच्याशी लग्न करण्याचे वचन दिले. त्यानंतर सदर तरुणी तक्रार न करताच माघारी फिरली. मग त्यांचा विवाहही पार पडला. मात्र आता या प्रकरणी शिक्षण विभागाने गटशिक्षणाधिकाऱ्यांविरोधात चौकशीचे आदेश दिले आहेत.
सदर तरुणी पोलीस ठाण्यात पोहोचल्याचे कळताच सदर शिक्षणाधिकारी धावत पळत जरहागाव पोलीस ठाण्यात पोहोचले होते. तिथे सदर गर्लफ्रेंड आणि अधिकाऱ्यांच्या कुटुंबीयांमध्ये वाद सुरू होता. सदर प्रकरणाची माहिती मिळताच गटशिक्षणाधिकाऱ्यांची पहिली पत्नी आणि त्याच्या गर्लफ्रेंडमध्ये हाणामारीही झाली होती. त्यानंतर सदर तरुणी पोलीस ठाण्यात पोहोचली होती. अखेरीस सदर अधिकारी कुटुंबीय आणि गर्लफ्रेंडची समजूत घालण्यात यशस्वी ठरला. तसेच त्याने सदर गर्लफ्रेंडसोबत विवाह करणार असल्याचे सांगितले.
दरम्यान, या विवाहाबाबत सतनाम सत्संग समितीचे अध्यक्ष चोवादास खांडेकर आणि इतर पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, पवित्र सिंह बेदीची पत्नी सुधा कौरसोबतत या विवाहाबाबत चर्चा केली गेली. यावेळी तिने पती पवित्र सिंग याला दुसरे लग्न करण्याची परवानगी दिली. खांडेकर यांनी सांगितले की, पवित्र सिंग याला अपत्य नाही आहे. त्यामुळे पहिल्या पत्नीने विवाहाची परवानगी दिली. तिघांच्या सहमतीने विवाहाचे विधी पार पडले.