"सर्व पैसे घेऊन स्मृतीला ऑस्ट्रेलियाला पळून जायचंय"; शहीद अंशुमनच्या वडिलांचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2024 03:40 PM2024-07-16T15:40:12+5:302024-07-16T15:47:21+5:30

अंशुमन यांच्या आई-वडिलांनी सुनेवर गंभीर आरोप केले आहेत.

martyr anshuman father said his daughter in law smriti wants to run away australia | "सर्व पैसे घेऊन स्मृतीला ऑस्ट्रेलियाला पळून जायचंय"; शहीद अंशुमनच्या वडिलांचा गंभीर आरोप

"सर्व पैसे घेऊन स्मृतीला ऑस्ट्रेलियाला पळून जायचंय"; शहीद अंशुमनच्या वडिलांचा गंभीर आरोप

शहीद कॅप्टन अंशुमन सिंह यांच्या पत्नी आणि कुटुंबीयांची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. अंशुमन यांच्या आई-वडिलांनी सुनेवर गंभीर आरोप केले आहेत. स्मृतीने त्यांच्या मुलासोबत प्रेमाचा सौदा केला आहे. तिला सर्व पैसा आणि प्रसिद्धी घेऊन ऑस्ट्रेलियाला पळून जायचं आहे असं एबीपी न्यूजशी संवाद साधताना अंशुमन यांनी म्हटलं आहे.

शहीद अंशुमन सिंह यांच्या वडिलांनी सांगितलं की, "स्मृतीने आपल्या मुलाशी प्रेमाचा सौदा केला आहे. तिचं माझ्या मुलावर प्रेम नाही. ती आता सर्व पैसे आणि कीर्ती चक्र घेऊन ऑस्ट्रेलियाला पळून जाण्याचा विचार करत आहे. स्मृतीचा भाऊ आणि वडील माझ्या घरी आले होते."

"स्मृतीचा भाऊ माझ्या पैशावर ऑस्ट्रेलियातून भारतात आला होता. मला आणि माझ्या कुटुंबाला पैशाची हाव नाही. स्मृतीने माझ्या मुलासोबत प्रेमाचा सौदा केला आहे, स्मृतीने सर्व पैसे आणि कीर्ती चक्र घेऊन ऑस्ट्रेलियाला पळून जाण्याचा प्लॅन केला आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षांच्या संवेदना फक्त स्मृतीलाच का? अंशुमनची आई देखील एक महिला आहे. तिच्या वेदना कोणाला कळणार?"

गेल्या वर्षी १९ जुलै रोजी सियाचीनमध्ये लष्कराच्या तंबूला लागलेल्या आगीतून आपल्या साथीदारांना वाचवताना अंशुमन सिंह शहीद झाले होते. त्यानंतर त्यांना मरणोत्तर कीर्ती चक्राने सन्मानित करण्यात आलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पत्नी स्मृती सिंह आणि आई यांना कीर्ती चक्र प्रदान केले. मात्र, तेव्हापासून यावरून वाद सुरू झाला आहे.

अंशुमनच्या कुटुंबीयांचा आरोप आहे की, स्मृती सिंह यांनी त्यांच्या मुलाला मिळालेल्या कीर्ती चक्राला स्पर्शही करू दिला नाही. ती सर्व काही घेऊन निघून गेली. आमचा मुलगाही शहीद झाला आणि आम्हाला काहीच मिळालं नाही असं म्हणत त्यांनी आपल्या सुनेवर गंभीर आरोप केले आहेत. 
 

Web Title: martyr anshuman father said his daughter in law smriti wants to run away australia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.